(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nepal Plane Crash : नेपाळ दुर्घटनेतील 68 मृतदेह हाती, चार जणांचा शोध सुरु; ब्लॅक बॉक्समधून समोर येणार अपघाताचं कारण
Nepal Plane Crash Update : नेपाळ दुर्घटनेतील 68 मृतहेद सापडले असून चार जणांचा शोध सुरु आहे. तसेच विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून अपघाताचं खरं कारण समोर येणार आहे.
Nepal Plane Crash Update : नेपाळमध्ये विमान कोसळून शनिवारी भीषण अपघात झाला. 72 प्रवासी असलेले यती एअरलाइन्सचे ATR-72 विमान कोसळलं. या अपघातात विमानातील सर्व लोकांचा मृत्यू झाला आहे. या विमानात 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. अपघातानंतर अजूनही शोधकार्य सुरु असून 68 जणांचे मृतदेह हाती आले आहेत. अद्याप चार मृतदेहांचा शोध सुरु आहे. मृतांमध्ये पाच भारतीयांचाही समावेश आहे.
चार जणांचे मृतदेह अद्याप बेपत्ता
नेपाळ विमान अपघातातील चार जण अद्याप बेपत्ता आहेत. अपघातग्रस्त विमानातील बेपत्ता चार जण सर्व लहान मुले असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे महाव्यवस्थापक प्रेमनाथ ठाकूर यांनी सांगितले की, विमानात 2 वर्षांखालील 3 मुले आणि 10 वर्षांखालील 3 मुले होती. आतापर्यंत सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून केवळ एका लहान मुलाचा मृतदेह सापडला आहे.
ब्लॅक बॉक्समधून समोर येणार अपघाताचं कारण
विमानाचा ब्लॅक बॉक्स रेस्क्यू ऑपरेशन टीमच्या हाती लागला आहे. शोधपथकाला विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. अपघाताचे खरे कारण ब्लॅक बॉक्सच्या तपासानंतर उघड होईल. पोखरातील रहिवाशांच्या व्यतिरिक्त इतर सर्व मृतदेह काठमांडूतूनच नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.
Black box of crashed Nepal plane recovered
— ANI Digital (@ani_digital) January 16, 2023
Read @ANI Story | https://t.co/R8h2BwlTKX#BlackBox #NepalPlaneCrash #NepalPlane #Pokhara #Nepal #RescueOperations pic.twitter.com/vFheYCH5rM
क्रेनच्या साहाय्याने विमानाची अवशेष हटवण्याचे काम सुरु
नेपाळ विमान अपघातानंतर अद्याप शोध सुरू आहे. यामध्ये मोठ्या मशिन्सची मदत घेण्यात आली आहे. आता क्रेनच्या मदतीने विमानाचे अवशेष हटवले जात आहे. यासाठी सर्व पोलीस आणि बचावपथकाची मदत घेण्यात येत आहे.
#UPDATE Nepal aircraft crash | The search and rescue operations resume in Pokhara, a day after a Yeti Airlines aircraft crashed here and claimed 68 lives so far, as per the latest toll. pic.twitter.com/q9azE2Yv3t
— ANI (@ANI) January 16, 2023
यती एअरलाईन्सची उड्डाणे रद्द
यती एअरलाईन्सच्या विमानाचा रविवारी मोठा अपघात झाला. यामुळे 16 जानेवारी 2023 पर्यंत यती एअरलाईन्सची सर्व नियमित उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एअरलाइन्सने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या