एक्स्प्लोर

Nepal Plane Crash : ...तो शेवटचा क्षण, नेपाळ विमान दुर्घटनेआधीचा थरकाप उडवणारा व्हिडीओ; 72 जणांचा दुर्दैवी अंत

Nepal Plane Crash : नेपाळ विमान दुर्घटनेमध्ये क्रू मेंबर्ससह 72 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज असून तपासात खरं कारण समोर येईल.

Nepal Plane Crash Viral Video : नेपाळ विमान दुर्घटनेमध्ये (Nepal Plane Crash) पाच भारतीयांसह 72 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये दुर्घटनेआधी विमानाचं नियंत्रण बिघडल्याचं दिसून येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नेपाळच्या पोखरा विमानतळाजवळ हा मोठा विमान अपघात होण्यापूर्वीच्या शेवटच्या क्षणांचा व्हिडीओ समोर आला आहे.

रविवारी यती एअरलाइन्सच्या विमानात बसलेल्या पाच भारतीय प्रवाशांपैकी एक प्रवाशी पोखरामध्ये विमान क्रॅश होण्याच्या काही क्षण आधी फेसबुकवर लाइव्ह होता. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, यती एअरलाइन्सचे विमान पोखरा विमानतळाच्या दिशेने जात असताना अचानक विमानाचे नियंत्रण बिघडते आणि ते खाली कोसळते आणि त्यानंतर आग लागल्याचे दिसत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ : नेपाळ विमान दुर्घटनेआधीचा शेवटचा क्षण

आणखी एक व्हिडीओ व्हायरल

नेपाळ विमान दुर्घटनेचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पोखरा विमानतळाजवळ विमान क्रॅश होण्यापूर्वी दुर्घटनास्थळाजवळील इमारतीच्या छतावरून रेकॉर्ड करण्यात आला आहे. प्राथमिक अहवालानुसार, विमानाचे नियंत्रण सुटले आणि ही दुर्घटना घडली. विमान अपघात स्थळापासून काही अंतरावर असलेल्या इमारतीच्या छतावरून काढण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये एटीआर-72 विमान हवेत हेलखावे खाताना आणि त्यानंतर कोसळताना दिसत आहे.

पाच भारतीयांसह 72 जणांचा मृत्यू

नेपाळमधील पोखरा येथे रविवारी झालेल्या भीषण विमान अपघातात पाच भारतीयांसह 72 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या विमानात चार क्रू मेंबर्ससह एकूण 72 लोक होते. यती एअरलाईन्सचे हे विमान पोखरा विमानतळाजवळील सेती नदीच्या दरीत कोसळले. अंधारामुळे बचावकार्य थांबवावे लागले. 21 मृतदेहांची ओळख पटली आहे. तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज असून तपासात खरं कारण समोर येईल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या

Nepal Plane Crash : नेपाळ दुर्घटनेतील 68 मृतदेह हाती, चार जणांचा शोध सुरु; ब्लॅक बॉक्समधून समोर येणार अपघाताचं कारण

महत्त्वाच्या बातम्या

US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव; भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव; भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
US Midterm Elections Result 2026 Live Updates: अमेरिकेच्या निवडणुकीत धडकी भरवणारा निकाल; डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, अमेरिकेत काय काय घडलं? LIVE
अमेरिकेच्या निवडणुकीत धडकी भरवणारा निकाल; डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, अमेरिकेत काय काय घडलं? LIVE
Barack Obama US Midterm Elections Result 2026: मोठी बातमी : डोनाल्ड ट्रम्प हरले, बराक ओबामा म्हणाले, ही तर फूट पाडणाऱ्यांना चपराक, अमेरिकेच्या एकीचा विजय
मोठी बातमी : डोनाल्ड ट्रम्प हरले, बराक ओबामा म्हणाले, ही तर फूट पाडणाऱ्यांना चपराक, अमेरिकेच्या एकीचा विजय
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या निवडणुकीत उलथापालथ; डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करणारा ढाण्या वाघ कोण?
अमेरिकेच्या निवडणुकीत उलथापालथ; डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करणारा ढाण्या वाघ कोण?

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget