(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NASA : एखाद्या क्षेपणास्त्राच्या वेगाने पृथ्वीच्या जवळ येतोय Asteroid, कितपत धोका? नासाकडून अलर्ट
Asteroid Close To Earth : अमेरिकन अंतराळ संस्था नासाने (NASA) अशाच एका लघुग्रहाबाबत अलर्ट जारी केला आहे. विमानाच्या आकाराचा हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळ येऊ शकतो.
Asteroid Close To Earth : एका मागोमाग एक अॅस्टरॉयड (Asteroid) म्हणजेच लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येत आहेत. यापैकी काही लघुग्रह आपल्या पृथ्वीसाठी धोकादायक असू शकतात. अमेरिकन अंतराळ संस्था नासाने (NASA) अशाच एका लघुग्रहाबाबत अलर्ट जारी केला आहे. विमानाच्या आकाराचा हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळ येऊ शकतो. त्याचे नाव 'Asteroid 2022 VM2' (Asteroid 2022 VM2) आहे. त्याचा 'संभाव्य धोकादायक' श्रेणीत समावेश करण्यात आला आहे, याचाच अर्थ तो आपल्या पृथ्वीच्या अगदी जवळ येत आहे.
पृथ्वीला कितपत धोका? नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले...
नासाच्या रिपोर्ट्सनुसार, लवकरच हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येईल. त्यानंतर दोघांमधील अंतर 31 लाख किलोमीटर राहील. लघुग्रहाचा आकार 76 फूट असून तो ताशी 13,345 किलोमीटर वेगाने प्रवास करत आहे. नासाच्या माहितीनुसार, हा लघुग्रह क्षेपणास्त्राच्या वेगाने लघुग्रह आपल्या जवळ येत आहे, 80 लाख किलोमीटरपर्यंत पृथ्वीजवळ येणाऱ्या अशा लघुग्रहांना संभाव्य धोकादायक श्रेणीत ठेवण्यात आले आहे. लघुग्रह 2022 VM2 देखील या श्रेणीमध्ये समाविष्ट आहे, कारण तो 31 लाख किलोमीटर पृथ्वीच्या जवळून जाईल. या लघुग्रहामुळे ग्रहाला कोणतीही हानी होणार नसून तो पृथ्वीपासून खूप दूर जाईपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवले जाणार असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.
'अपोलो ग्रुप'चा लघुग्रह
हा लघुग्रह 'अपोलो ग्रुप'चा आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यातच याचा शोध लागला आहे. लघुग्रह 2022 VM2 ला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 552 दिवस लागतात. या दरम्यान, सूर्य आणि सूर्यामधील कमाल अंतर 244 दशलक्ष किलोमीटर, सर्वात जवळचे अंतर 150 दशलक्ष किलोमीटर आहे. नासा आपल्या सर्व दुर्बिणींच्या मदतीने या लघुग्रहांचा मागोवा घेते.
DART मिशनची यशस्वी चाचणी
अलीकडेच याने DART मिशनची यशस्वी चाचणी देखील केली आहे. ही चाचणी पृथ्वीला भविष्यात लघुग्रहांच्या संभाव्य हल्ल्यापासून वाचवू शकते. ज्याप्रमाणे आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात, त्याचप्रमाणे लघुग्रह देखील सूर्याभोवती फिरतात. शास्त्रज्ञांनी आतापर्यंत 11 लाख 13 हजार 527 लघुग्रह शोधले आहेत.
नासाचे लघुग्रहांवर लक्ष
नासा ही जगप्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्था या लघुग्रहांवर लक्ष ठेवून आहे. अलीकडचे काही दिवसापूर्वी शास्त्रज्ञांना दोन सुपर अर्थचा शोध लागला होता. नासासह जगभरातील अनेक संस्था यावर संशोधन करत असतात. आता या लघुग्रहांचे संकट येऊन ठेपले आहे. पृथ्वीला यापासून धोका निर्माण झाल्यास या लघुग्रहांवर रॉकेटच्या साहाय्याने बॉम्ब टाकण्याचाही नासाचा विचार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या