NASA : नासासाठी महत्त्वाचा क्षण! डार्ट मिशनने अॅस्टेरॉयड दुसऱ्या कक्षेत ढकलला, शास्त्रज्ञांकडून मिशनचा निकाल जाहीर
NASA News : नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी निकाल ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, ग्रह संरक्षण आणि मानवतेसाठी हा एक महत्त्वाचा क्षण आहे.
NASA News : नासाच्या शास्त्रज्ञांनी डार्ट मिशनच्या (Nasa Dart Mission) अवकाश मोहिमेचे निकाल जाहीर केले आहेत. अलीकडे, डार्ट अंतराळयान डिमॉर्फोस लघुग्रहाशी टक्कर झाल्याचे दिसले. त्यानंतर ते दुसऱ्या कक्षेत ढकलण्यात सक्षम झाले. 'सेव्ह द वर्ल्ड' चाचणीची घोषणा करताना नासा एजन्सीने ही माहिती दिली. नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी निकाल ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, ग्रह संरक्षण आणि मानवतेसाठी हा एक महत्त्वाचा क्षण आहे.
अचूक डेटा गोळा केला
या मोहिमेचा उद्देश अॅस्टेरॉयडच्या मार्गातील बदलांची अचूक माहिती शोधणे हा होता. नासाने सांगितले की, त्यांचे पाठवलेले अंतराळ यान अॅस्टेरॉयडवर आदळले, त्यामुळे मोठे खड्डे तयार झाले आणि त्याचे अवशेष अवकाशात पसरले. या 520 फूट लांबीच्या अॅस्टेरॉयडमुळे किती फरक पडला? तसेच त्याचा यानावर किती परिणाम झाला? हे जाणून घेण्यासाठी दुर्बिणच्या मदतीने अनेक दिवस निरीक्षण करण्यात आले.
NASA says spaceship successfully deflected asteroid in test to save Earth, reports AFP
— ANI (@ANI) October 11, 2022
टेलिस्कोपद्वारे देखरेख
चंद्राला मूळ अॅस्टेरॉयडभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी 11 तास 55 मिनिटे लागली. शास्त्रज्ञांना अशी अपेक्षा होती की डिमॉर्फोसची कक्षा पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ सुमारे 10 मिनिटांनी कमी होईल. पण वेळ 32 मिनिटांनी कमी केल्याचे नेल्सनने सांगितले. याच्या तीव्रतेच्या सखोल अभ्यासासाठी, शास्त्रज्ञांनी दुर्बिणीच्या मदतीने डिमॉर्फोस लघुग्रहाचे निरीक्षण केले. टक्कर झाल्यानंतर त्याच्या कक्षेत फिरण्याच्या गतीमध्ये काय फरक आहे ते शोधले.हा
हा फरक जाणवला
नासाने सांगितले की, अॅस्टेरॉयडची यानाशी टक्कर होण्यापूर्वी त्याला ऑरबिट फिरण्यासाठी 11 तास 55 मिनिटे लागली होती. त्याच वेळी, त्यात 10 मिनिटांची घट नोंदवली गेली होती, परंतु नासाच्या म्हणण्यानुसार, 32 मिनिटांची घट झाली आहे.
अॅस्टेरॉयडची दिशा बदलण्यासाठी चाचणी
पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या अॅस्टेरॉयडची दिशा बदलण्यासाठी नासाने पहिली चाचणी केली. त्याच वेळी, गेल्या वर्षी ताशी 22 हजार 500 किलोमीटर वेगाने येणारे हे यान 1.10 किलोमीटर दूर असलेल्या अॅस्टेरॉयडवर आदळले होते. या मिशनसाठी जगात अनेक ठिकाणी दुर्बिणी लावून निरीक्षण करण्यात आले. या मोहिमेचा उद्देश लघुग्रहाच्या मार्गातील बदलांची अचूक माहिती शोधणे हा होता. अंतराळातील लघुग्रहाशी टक्कर होण्यासाठी नासा यानाचे नियंत्रण करू शकते, हेही या टक्करमधून स्पष्ट झाले आहे. अंतराळातील सूक्ष्म लक्ष्य देखील यानाद्वारे लक्ष्य केले जाऊ शकते