एक्स्प्लोर

रोहिंग्या मुस्लिमांच्या विस्थापनावरुन म्यानमारच्या आँग सान सू क्यींनी मौन सोडलं

रोहिंग्या मुस्लिमांना देशातून विस्थापित व्हावं लागल्यावरुन म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आणि स्टेट काऊन्सिलर आँग सान सू क्यी यांनी मौन सोडलं आहे. क्यी यांनी देशाला संबोधित करताना, म्यानमारच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राथमिकता असल्याचं स्पष्ट केलं.

यंगून : रोहिंग्या मुस्लिमांना देशातून विस्थापित व्हावं लागल्यावरुन म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आणि स्टेट काऊन्सिलर आँग सान सू क्यी यांनी मौन सोडलं आहे. क्यी यांनी देशाला संबोधित करताना, म्यानमारच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राथमिकता असल्याचं स्पष्ट केलं. तसेच, ज्या रोहिंग्या मुस्लिमांना देशात परतण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी म्यानमार रेफ्यूजी व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरु करण्यात येईलस असंही सांगितलं. देशाला संबोधित करताना आँग सान सू क्यी म्हणाल्या की, "राखाइन राज्यात हिंसाचार उफाळून आल्यानंतर, येथील रोहिंग्या मुस्लिमांना पलायन करावं लागल्याच्या घटनेवर संपूर्ण जगाचं लक्ष आहे. यावरुन देशावर चहूबाजूंनी टीका सुरु आहे. पण या हिंसाचारामागे गेल्या वर्षभरातील कट्टरवादी रोहिंग्या समाजातील तरुणांकडून होणारे हल्ले कारणीभूत आहेत. कट्टरवाद्यांनी पोलीस चौक्यांना लक्ष्य केल्यानंतर हिंसाचार उफाळून आला. यावेळी अनेक घरांना आग लावण्यात आल्याने, लाखो नागरिकांना विस्थापित व्हावे लागले." त्या पुढे म्हणाल्या की, "25 ऑगस्टच्या घटनेनंतर सरकारने अराकन रोहिंग्या सॅलवेशन आर्मीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं. आम्हाला देशात शांतता हवी आहे. जाती धर्माच्या आधारे कोणी दंगली भडकवण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते सहन केलं जाणार नाही." हिसांचारानंतर विस्थापित रोहिंग्यांच्या प्रश्नावर बोलताना सान सू क्यी म्हणाल्या की, "जे लोक देशात परतण्याची इच्छा बाळगून आहेत. त्यांच्यासाठी सरकारकडून म्यानमार रेफ्यूजी व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरु करण्यात येईल. मला त्या लोकांशी चर्चा करायची आहे, जे राखाइन सोडून बांगलादेशाच्या आश्रयाला गेले आहेत." याशिवाय, त्यांनी आंतरराष्ट्रीय जगतालाही आवाहन केलं आहे. त्या म्हणाल्या की, "म्यानमारकडे एक देश म्हणून पाहावे, ना की एक लहान दंगलग्रस्त परिसर म्हणून." याशिवाय रखाइनमध्ये कारवाई करताना स्थानिकांना नुकसान पोहचू नये, याची काळजी घेण्याच्या सूचना म्यानमार लष्कराला दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. तसेच हिंसाचारामुळे निर्वासित व्हावं, लागल्यांप्रती मी संवेदना व्यक्त करत असल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या. 25 ऑगस्ट रोजी म्यानमारमधील राखाइनमध्ये हिंसाचार उफाळून आल्यानंतर, जवळपास 4 लाखापेक्षा जास्त रोहिंग्या मुस्लिमांनी देशातून पलायन केलं. या घटनेची संयुक्त राष्ट्रानेही निंदा केली होती. काय म्हणाल्या आँग सान सू क्यी? संबंधित बातम्या रोहिंग्यांना ट्रेनिंग देण्यासाठी आलेला अल-कायदाच्या दहशतवाद्याला अटक रोहिंग्या मुस्लिमांचं भारतात राहणं धोकादायक, केंद्र सरकारचं सुप्रीम कोर्टात उत्तर

महत्त्वाच्या बातम्या

Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
Nuclear Attack : पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget