200 वर्षांपूर्वीचं कंडोम, कोणत्या म्युझियममध्ये ठेवण्यात आलंय? खासियत काय?
Museum displays a 200 year old condom : 200 वर्षांपूर्वीचं कंडोम, कोणत्या म्युझियममध्ये ठेवण्यात आलंय? खासियत काय?

Museum displays a 200 year old condom : नेदरलँड्सच्या पश्चिम भागात उत्तर हॉलंड ह्या प्रांतात वसलेल्या अॅमस्टरडॅमच्या राइक्स म्युझियममधील एका प्रदर्शनात 200 वर्षांपूर्वीचं कंडोम ठेवण्यात आलं आहे. (Museum displays a 200 year old condom) हे कंडोम चांगल्या स्थितीत असल्याचे दिसत आहे. हे कंडोम मेंढीच्या अपेंडिक्सपासून बनवण्यात आला असल्याचे समजले जाते. यावर एका नन आणि तीन पाद्रींचे चित्र छापलेले आहे. ही दुर्मीळ कलाकृती 1830 सालाची असून, गेल्या वर्षी संग्रहालयाने ती एका लिलावातून विकत घेतली होती. (Museum displays a 200 year old condom)
हे कंडोम 19 व्या शतकातील वेश्या व्यवसाय आणि लैंगिकतेवरील एका प्रदर्शनाचा भाग आहे. या प्रदर्शनात प्रिंट्स, चित्रे आणि छायाचित्रे देखील प्रदर्शित करण्यात आली आहेत. राइक्सम्युझियमच्या क्युरेटर जॉईस झेलेन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले की, त्यांनी आणि त्यांच्या एका सहकाऱ्याने जेव्हा लिलावात हे कंडोम प्रथम पाहिले, तेव्हा त्यांना हसू आले होते. त्यांनी सांगितले की, कुणीही या कंडोमकडे लक्ष दिले नव्हते. केवळ त्यांनीच त्यासाठी बोली लावली होती. (Museum displays a 200 year old condom)
हे कंडोम मिळाल्यानंतर त्यांनी त्याची अल्ट्राव्हायोलेट प्रकाशात तपासणी केली आणि तेव्हा लक्षात आले की त्याचा वापर कधीच झालेला नव्हता. झेलेन म्हणाल्या, "ते खूप चांगल्या स्थितीत होते." पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, या कंडोमच्या प्रदर्शनानंतर संग्रहालय लोकांनी पाहायला गर्दी केली होती. तरुण आणि वयोवृद्ध दोघांनीही या प्रदर्शनात रस दाखवला आहे. (Museum displays a 200 year old condom)
झेलेन म्हणाल्या की, असा अंदाज आहे की हे कंडोम फ्रान्समधील एखाद्या उच्चभ्रू वेश्या व्यवसायाच्या ठिकाणचं 'स्मृतीचिन्ह' आहे. असेही म्हटले जाते की अशा प्रकारचे केवळ दोनच कंडोम आज अस्तित्वात आहेत. संग्रहालयाने सांगितले की, हे असामान्य कंडोम त्या काळातील लैंगिक आरोग्याचे पैलू दाखवते – जेव्हा लैंगिक आनंदाच्या शोधात अनिच्छित गर्भधारणा आणि सिफिलिस या रोगांचा धोका कायम असायचा. (Museum displays a 200 year old condom)
या कंडोमवर छापलेली चित्रे पाहिल्यास, एक नन बसलेली असून तिचे कपडे उघडे आहेत. ती नन तीन पाद्रींकडे इशारा करत आहे, आणि पाद्री तिच्यासमोर उभे आहेत. या कंडोमवर "Voila Mon Choix" (व्होयला मॉन च्वॉयस) असे फ्रेंच शब्द लिहिले आहेत, ज्याचा अर्थ आहे – "ही माझी इच्छा आहे."
संग्रहालयाच्या मते, या चित्राची व्याख्या "ब्रह्मचर्य आणि ग्रीक पुराणकथांतील पॅरिसच्या निर्णयाची एक विडंबनात्मक रूप" अशी करता येते. पॅरिस हा ट्रोजन राजकुमार होता, ज्याला एफ़्रोडाइट, हेरा आणि अथेना या तिघींमध्ये सर्वात सुंदर देवी कोण आहे, हे ठरवायचे होते. या संग्रहालयाच्या प्रिंट विभागात साडेसात लाख प्रिंट्स, चित्रे आणि छायाचित्रे आहेत. पण कंडोमवर प्रिंट असलेला हा त्यांच्या संग्रहातील पहिलाच नमुना आहे. (Museum displays a 200 year old condom)
झेलेन म्हणाल्या, "आम्ही अभिमानाने सांगू शकतो की आमच्याकडे प्रिंटेड कंडोम असलेले एकमेव कला संग्रहालय आहे." त्यांनी सांगितले की, त्यांची संस्था ही कलाकृती इतर संग्रहालयांना उधार देण्यासाठी तयार आहे, पण हा कंडोम खूप नाजूक आहे. त्यामुळे तो प्रदर्शनात फक्त नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत ठेवण्यात येणार आहे. (Museum displays a 200 year old condom)
इतर महत्त्वाच्या बातम्या























