एक्स्प्लोर
जगातील श्रीमंत शहरांच्या यादीत मुंबई 12 व्या स्थानी
सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या शहरांची यादी पाहता मुंबई टॉप 10 मध्ये आहे. 1 बिलियनपेक्षा जास्त संपत्ती असलेले 28 अब्जाधीश मुंबईत आहेत.
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई जगभरातील श्रीमंतांच्या यादीत झळकली आहे. 950 बिलियन डॉलर म्हणजे तब्बल 611,27,75,00,00,000 (अंदाजे 61 लाख 12 हजार 775 कोटी) रुपये संपत्ती असलेली मुंबई जगभरातील 15 श्रीमंत शहरांमध्ये 12 व्या स्थानी आहे.
न्यूयॉर्कने या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. न्यूयॉर्कची संपत्ती 3 ट्रिलियन डॉलर म्हणजे 193019,09,99,99,999 (अंदाजे 193 लाख कोटी) रुपये आहे. 'न्यू वर्ल्ड हेल्थ'ने अहवालात ही माहिती दिली आहे.
जगातील 15 श्रीमंत शहरांची यादी आणि संपत्ती
1. न्यूयॉर्क (अमेरिका) - 3 ट्रिलियन डॉलर
2. लंडन (यूके) - 2.7 ट्रिलियन डॉलर
3. टोकियो (जपान) - 2.5 ट्रिलियन डॉलर
4. सॅन फ्रान्सिस्को (कॅलिफोर्निया) - 2.3 ट्रिलियन डॉलर
5. बीजिंग (चीन) - 2.2 ट्रिलियन डॉलर
6. शांघाय (चीन) -2 ट्रिलियन डॉलर
7. लॉस एंजेलस (कॅलिफोर्निया) - 1.4 ट्रिलियन डॉलर
8. हाँग काँग - 1.3 ट्रिलियन डॉलर
9. सिडनी (ऑस्ट्रेलिया) - 1 ट्रिलियन डॉलर
10. सिंगापूर - 1 ट्रिलियन डॉलर
11. शिकागो - 988 बिलियन डॉलर
12. मुंबई (भारत) - 950 बिलियन डॉलर
13. टोरंटो (कॅनडा) - 944 बिलियन डॉलर
14. फ्रँकफर्ट (जर्मनी) - 912 बिलियन डॉलर
15. पॅरिस (फ्रान्स) - 860 बिलियन डॉलर
ही संपत्ती म्हणजे त्या-त्या शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची एकूण वैयक्तिक संपत्ती. यामध्ये मालमत्ता, रोकड, इक्विटी यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. सरकारी निधी यातून वगळण्यात आला आहे.
जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत भारत सहावा
सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या शहरांची यादी पाहता मुंबई टॉप 10 मध्ये आहे. 1 बिलियनपेक्षा जास्त संपत्ती असलेले 28 अब्जाधीश मुंबईत आहेत. 'मुंबईची एकूण संपत्ती 950 बिलियन डॉलर इतकी आहे. हे शहर भारताची आर्थिक राजधानी आहे. जगातील 12 व्या क्रमांकाचं सर्वात मोठं स्टॉक एक्स्चेंज - बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) मुंबईत आहे. आर्थिक सेवा, रिअल इस्टेट आणि मीडिया या मुंबईतील सर्वात मोठ्या इंडस्ट्रीज आहेत' असं अहवालात म्हटलं आहे.देशातील 73 टक्के संपत्ती फक्त 1 टक्के श्रीमंतांकडे : अहवाल
गेल्या दहा वर्षांत सॅन फ्रान्सिस्को, बीजिंग, शांघाय, मुंबई आणि सिडनी या शहरांची संपत्ती गेल्या दहा वर्षात वेगाने वाढली आहे. ह्यूस्टन, जिनीव्हा, ओसाका, सेओल, शेंगेन, मेलबर्न, झुरिच, दलास यांचा टॉप 15 च्या यादीत समावेश थोडक्यात हुकला. जगातील श्रीमंत देशांच्या यादीत भारताचा सहावा क्रमांक लागतो. भारताची संपत्ती 8 हजार 230 अब्ज डॉलर इतकी आहे. अमेरिका जगातील सर्वात श्रीमंत देश ठरला आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
राजकारण
क्रीडा
Advertisement