एक्स्प्लोर

भारताला मोठं यश! 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी अबू बकरला अटक

Mumbai 1993 serial blast : मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटाने अवघ्या देशाला हादरवलं. देशातील हा सर्वात मोठा बॉम्बस्फोट होता. या हल्लात 257 जणांचा मृत्यू झाला होता तर सातशे पेक्षा जास्त जण जखमी झाले होते.

Mumbai 1993 serial blast : मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटाने अवघ्या देशाला हादरवलं. देशातील हा सर्वात मोठा बॉम्बस्फोट होता. या हल्लात 257 जणांचा मृत्यू झाला होता तर सातशे पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. या हल्ल्याच्या कटू आठवणी आजही मुंबईकरांच्या मनात आहेत. या बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी अबू बकर याला पकडण्यात भारताला यश आले आहे. अबू बकर याला युएईतून अटक करण्यात आले आहे. त्याला लवकरच भारतात परत आणले जाणार आहे. सध्या अबूच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरु आहे. इंडिया टुडेनं सुत्राच्या हवाल्याने याबाबतचं वृत्त दिले आहे. तब्बल 29 वर्षानंतर मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपी अबू बकर भारताच्या हाती लागला आहे. 

विदेशातील एका मोठ्या ऑपरेशनमध्ये भारतीय एजेन्सीला (Indian Agencies) मोठं यश आलं आहे. अबू बकर हा दाऊद इब्राहिमचा अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो.  1997 मध्ये अबू बकर याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, अबू बकरचे दुबईमधील अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांशी हितसंबंध आहेत. तसेच अबू बकर याने दुबईतील एका इराणी मुलीशी लग्न केलं आहे. 
 
मुंबई हल्ल्यामध्ये वापरण्यात आलेलं आरडीएक्सचं लॅन्डिंग आणि दाऊबसोबत दुबईतून कट रचण्यात अबू बकरचा हात होता. त्यामुळे भारतीय यंत्रणा अबू बकरच्या मागावर होत्या. अखेर एका मोठ्या ऑपरेशनमध्ये भारतीय एजेन्सीने अबूला बेड्या ठोकल्या आहेत.  सध्या अबूच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरु आहे.

12 मार्च, 12 स्फोट: 1993 मध्ये कुठे आणि कसे स्फोट झाले?
13 मार्च 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात तब्बल 257 लोकांचा मृत्यू झाला. कुणी आपली आई..तर कुणी बाबा…कुणी भाऊ, तर कुणी बहीण गमावली. या स्फोटात शेकडो लोक जखमी झाले, ज्यांच्या जखमा अजूनही भरल्या नाहीत. 

12  मार्च 1993 रोजी काय झालं ? 
पहिला स्फोट : 12 मार्चच्या दुपारी मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीबाहेर दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी देशाला हादरवणारा पहिला बॉम्बस्फोट झाला. या स्फोटाचा आवाज काही किलोमीटरपर्यंत पोहोचला. स्टॉक एक्सेंजच्या 29 व्या मजल्यावरील माणूसही जागच्या जागी पडला, एवढा मोठा हा स्फोट होता. स्फोटाच्या आजूबाजूला रक्ताचा सडा वाहू लागला. स्फोटाठिकाणी जवळपास 2 हजार लोकांची गर्दी होती. बेसमेंटच्या पार्किंगमध्ये आरडीएक्सनी भरलेल्या एका कारमध्ये हा स्फोटा झाला होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजबाहेरील या स्फोटात 84 लोकांचा मृत्यू आणि 200 हून अधिक लोक जखमी झाले. 
दुसरा स्फोट : दुपारी 2.15 वाजता, नरसी नाथ स्ट्रीट 
तिसरा स्फोट : दुपारी 2.30 वाजता, शिवसेना भवन 
चौथा स्फोट : दुपारी 2.33 वाजता, एयर इंडिया बिल्डिंग 
पाचवा स्फोट : दुपारी 2.45 वाजता, सेंच्युरी बाजार 
सहावा स्फोट : दुपारी 2.45 वाजता, माहिम 
सातवा स्फोट : दुपारी 3.05 वाजता, झवेरी बाजार 
आठवा स्फोट : दुपारी 3.10 वाजता, सी रॉक हॉटेल 
नववा स्फोट : दुपारी 3.13 वाजता, प्लाझा सिनेमा 
दहावा स्फोट : दुपारी 3.20 वाजता, जुहू सेंटॉर हॉटेल
अकरावा स्फोट : दुपारी 3.30 वाजता, सहार विमानतळ 
बारावा स्फोट : दुपारी 3.40 वाजता, विमानतळ सेंटॉर हॉटेल 

बॉम्बस्फोटानंतर काय झालं?

  • 4 नोव्हेंबर 1993 रोजी 10 हजार पानांचं 189 जणांविरोधात पहिलं आरोपपत्र दाखल
  • 19 नोव्हेंबर 1993 रोजी प्रकरणं सीबीआयकडे सुपूर्द
  • 19 एप्रिल 1995 रोजी मुंबईतील टाडा कोर्टात सुनावणी सुरु
  • टाडा कोर्टाकडून आरोपींविरोधात आरोप निश्चिती
  • ऑक्टोबर 2000 मध्ये सरकारी पक्षाच्या साक्षीदारांचे जबाब घेतले गेले
  • ऑक्टोबर 2001 मध्ये सरकारी पक्षाचा युक्तीवाद पूर्ण
  • सप्टेंबर 2003 मध्ये संपूर्ण प्रकरणाची सुनावणी पूर्ण
  • सप्टेंबर 2006 मध्ये कोर्टाने निर्णय देणं सुरु केलं
  • या प्रकरणात एकूण 123 आरोपी होते, ज्यामधील 12 जणांना कनिष्ठ कोर्टाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. यामधील 20 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, ज्यामधील दोघांचा मृत्यू झाला आहे.  याशिवाय इतर 68 जणांना जन्मठेपेहून कमी शिक्षा सुनावली गेली होती. मात्र, त्यातील 23 जण निर्दोष सुटले.
  • नोव्हेंबर 2006 मध्ये बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला पिस्तूल आणि एके-56 रायफल्स ठेवल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले.
  • 1 नोव्हेंबर 2011 मध्ये सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली
  • सुप्रीम कोर्टात 10 महिने सुनावणी सुरु राहिली
  • ऑगस्ट 2012 मध्ये सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला. 2006 साली मुंबई कोर्टाने सुनावणीत निर्णय दिला, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा समावेश होता. त्यामध्ये याकूब मेमन, यूसूफ मेमन, इसा मेमन आणि रुबिना मेमन यांचा समावेश होता. या सर्वांवर बॉम्बस्फोटाचा कट आणि दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले.
  • मुंबईच्या टाडा कोर्टाने याकूबला फाशी सुनावल्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. अनेक वाद-विवादांनंतर अखेर 30 जुलै 2015 रोजी सकाळी 7 वाजता याकूब मेमनला फाशी देण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kho Kho World cup| खो-खोने आम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवलं, कर्णधार प्रतीक वायकरची प्रतिक्रियाSaif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Embed widget