एक्स्प्लोर
नासाचे 'इनसाईट' मंगळावर लॅन्ड, काय आहेत वैशिष्ट्ये?
नासाच्या इनसाईट यानाची वैशिष्ट्ये
मुंबई : नासाचे इनसाईट (इंटेरिअर एक्सप्लोरेशन युझिंग सिस्मिक इन्व्हेस्टिगेशन) यान मंगळ ग्रहावर उतरले. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज पहाटे 1 वाजून 24 मिनिटांनी इनसाईट यान मंगळावर उतरले. नासाकडून याचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले. मंगळ ग्रहावरील रहस्य जाणून घेण्यासाठी हे यान बनवण्यात आले आहे. ग्रहाच्या पृष्ठभागावर यान उतरताना १९८०० किमी प्रति तास वेगाने जाणारे हे यान अवघ्या सहा मिनिटात शून्य वेगावर आले. त्यानंतर यान पॅराशूटमधून बाहेर आले आणि लँड झाले. दरम्यान, इनसाईटने मंगळ ग्रहावरुन आपले पहिले छायाचित्रही पाठवले आहे.
नासाच्या इनसाईट यानाची वैशिष्ट्ये
- पूर्ण नाव - इंटेरिअर एक्सप्लोरेशन युझिंग सिस्मिक इन्व्हेस्टिगेशन
- वजन - 358 किलोग्रॅम
- मिशनसाठी तब्बल 7 हजार कोटींचा खर्च
- सौर उर्जा आणि बॅटरीद्वारे वीजपुरवठा
- मंगळावर 26 महिन्यांपर्यंत काम करु शकतो
- या मिशनमध्ये अमेरिका, जर्मनी, फ्रान्ससह 10 देशांचे शास्त्रज्ञ सहभागी
- इनसाईटमध्ये सिस्मोमीटर यानच मुख्य उपकरण आहे.
- इनसाईट यानाद्वारे मंगळावरील भूकंपांची नोंद होणार
- सेल्फ हॅमरिंगद्वारे मंगळावर खोदकाम करुन मंगळावरील उष्णतेची नोंद घेणार
My first picture on #Mars! My lens cover isn’t off yet, but I just had to show you a first look at my new home. More status updates:https://t.co/tYcLE3tkkS #MarsLanding pic.twitter.com/G15bJjMYxa
— NASAInSight (@NASAInSight) November 26, 2018
???? Wish you were here! @NASAInSight sent home its first photo after #MarsLanding:
InSight’s view is a flat, smooth expanse called Elysium Planitia, but its workspace is below the surface, where it will study Mars’ deep interior. pic.twitter.com/3EU70jXQJw — NASA (@NASA) November 26, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement