एक्स्प्लोर

आयजी ते आयर्नमॅन, IPS कृष्णप्रकाश यांच्याकडून अवघड ट्रायथलॉन पूर्ण!

फ्रान्समधील ट्रायथलॉन या स्पर्धेत कृष्णप्रकाश यांनी 3.86 किलोमीटर पोहणे, 42 किलोमीटर धावणे आणि 180 किलोमीटर सायकलिंग हे अवघ्या 14 तास 8 मिनिटात पूर्ण केलं.

मुंबई: जगात सर्वात खडतर समजली जाणारी फ्रान्समधील ट्रायथलॉन स्पर्धा यंदा आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांनी  जिंकली आहे. अभिनेता मिलिंद सोमण यांच्यानंतर लोहपुरुषाचा हा किताब पटकावणारे ते दुसरे भारतीय, तर भारतातले पहिले पोलीस अधिकारी ठरले आहेत. आयजी कृष्णप्रकाश आता आयर्नमॅन कृष्णप्रकाश बनले आहेत. फ्रान्समधील ट्रायथलॉन या स्पर्धेत कृष्णप्रकाश यांनी 3.86 किलोमीटर पोहणे, 42 किलोमीटर धावणे आणि 180 किलोमीटर सायकलिंग हे अवघ्या 14 तास 8 मिनिटात पूर्ण केलं. सुपरमॉडेल मिलिंद सोमण आता 'आयर्नमॅन', सर्वात अवघड 'ट्रायथलॉन'चं जेतेपद  ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी 17 तासांचा अवधी असतो, मिलिंद सोमण यांनी 15 तासात पूर्ण केली होती. मात्र आता कृष्णप्रकाश यांनी त्यांच्याही पुढे मजल मारली आहे. ट्रायथलॉन म्हणजे काय? ट्रायथलॉन म्हणजे वेगवेगळ्या अॅथलेटीक क्रीडा प्रकारांचा समावेश असलेली स्पर्धा. यात मुख्यतः धावणे, पोहणे आणि सायकल चालवणे या स्पर्धांचा समावेश असतो. हे तिन्ही क्रीडाप्रकार सलग पार पाडायचे असून त्याचं अंतर ठरलेलं असतं. वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेत 3.8 किलोमीटर स्विमिंग, 180.2 किलोमीटर सायकलिंग, 42.2 किलोमीटर धावण्याचा समावेश होता. ‘आयर्नमॅन’ हा किताब जिंकण्यासाठी स्पर्धकांना ही ट्रायथलॉन 17 तासांमध्ये पूर्ण करणं गरजेचं असतं. कोण आहेत कृष्णप्रकाश? कृष्णप्रकाश हे 1998 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात महत्त्वाची पदं सांभाळली आहेत. त्यांची 2012 मध्ये मुंबईत अतिरिक्त आयुक्त, दक्षिण विभाग म्हणून बदली झाली. आयजी ते आयर्नमॅन, IPS कृष्णप्रकाश यांच्याकडून अवघड ट्रायथलॉन पूर्ण! मुंबईतील दक्षिण विभागातच दरवर्षी मॅरेथॉनचं आयोजन केलं जातं. ही स्पर्धा आझाद मैदना-वरळी-आझाद मैदान अशी होते. या स्पर्धेत देश-विदेशातील हजारो स्पर्धक भाग घेतात. या स्पर्धेचं नियोजन करणं म्हणजे पोलिसांसाठी मोठी कसरत असते. मात्र 2013 मध्ये कृष्णप्रकाश यांनी या स्पर्धेचं नियोजन अगदी सहज केलं होतं. कृष्णप्रकाश यांच्या त्यावेळच्या मुंबई हाफ मॅरेथॉनची कहाणी अगदी भन्नाट आहे. जिममध्ये ठरलं, हाफ मॅरेथॉन पूर्ण करायचं कृष्णप्रकाश हे एकदा जिममध्ये गेले असता, त्यावेळी तिथे पोलीस महानिरीक्षक (आयजी) अमिताभ गुप्ता आणि तत्कालिन उत्तर विभागाचे अतिरिक्त अधिक्षक विश्वास नांगरे पाटील हे सुद्धा होते. सुपरमॉडेल मिलिंद सोमण आता 'आयर्नमॅन', सर्वात अवघड 'ट्रायथलॉन'चं जेतेपद  त्या दोघांसोबतच्या गप्पांदरम्यान हाफ मॅरेथॉनची चर्चा झाली. ते दोघे या स्पर्धेत धावणार होते, ते ऐकून कृष्णप्रकाश यांनीही त्या स्पर्धेत धावण्याचं ठरवलं होतं. मात्र त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता की त्याच स्पर्धेचं नियोजन, सुरक्षेची जबाबदारी कृष्णप्रकाश यांच्यावरच होती. धावून आले, वर्दी चढवली त्यामुळे स्वत:वरची जबाबदारी पूर्ण करायची की स्पर्धेत धावायचं अशी द्विधा अवस्था कृष्णप्रकाश यांची झाली होती. मग कृष्णप्रकाश यांनी तत्कालिन पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह आणि सहआयुक्त सदानंद दाते यांची भेट घेतली.  त्यावेळी दोघांनी हसून सांगितलं होतं की मॅरेथॉनही तुमचीच आणि सुरक्षाही तुमचीच. आयजी ते आयर्नमॅन, IPS कृष्णप्रकाश यांच्याकडून अवघड ट्रायथलॉन पूर्ण! यानंतर मग जानेवारी 2013 मध्ये कृष्णप्रकाश यांनी मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन, ती स्पर्धा पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी आझाद मैदान पोलीस क्लबमध्ये जाऊन पोलीस युनिफॉर्म घातला होता. यानंतर ते प्रत्येक वर्षी या स्पर्धेत धावतात. आयपीएसचा फोन, फुल मॅरेथॉन धावण्याचा निर्णय यानंतर मग यावर्षी जानेवारी 2017 मध्ये झारखंडच्या आयपीएसचा कृष्णप्रकाश यांना फोन आला. त्यांनी आपण मुंबईला मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी येत असून, आझाद मैदान परिसरात रुम बूक करण्याची विनंती केली. त्यावेळी कृष्णप्रकाश यांनी आझाद मैदानात का, हाफ मॅरेथॉन तर वरळीतून सुरु होते, त्यामुळे मी वरळीत रुम बूक करतो, असं सांगितलं. त्यावेळी झारखंडच्या आयपीएसने आपण हाफ नाही तर फुल मॅरथॉनमध्ये धावणार असल्याचं सांगितलं. आयजी ते आयर्नमॅन, IPS कृष्णप्रकाश यांच्याकडून अवघड ट्रायथलॉन पूर्ण! यानंतर मग कृष्णप्रकाश यांनीही आपण का हाफ मॅरेथॉनमध्ये धावायचं, मी सुद्धा फुल मॅरेथॉनमध्ये धावणार, असं जाहीर केलं आणि ते धावू लागले. ट्रायथनॉलमध्ये धावण्याचा निर्णय कृष्णप्रकाश यांनी नाशिकमधील मालेगावातही सेवा बजावली आहे. त्यामुळे ते मालेगाव मॅरेथॉनमध्येही धावतात. एकदा मालेगावातील एका कार्यक्रमात त्यांची ओळख एका डॉक्टरशी झाली. त्या डॉक्टरांनी आपल्या 23 वर्षीय मुलाने फ्रान्सच्या हॉफ आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेत भाग घेतल्याचं सांगितलं. हे ऐकून कृष्णप्रकाश यांनी फुल ट्रायथलॉन स्पर्धेत धावण्याच निर्णय घेतला. अल्पावधित स्पर्धेची तयारी फ्रान्समधील ट्रायथलॉन स्पर्धेत धावण्याचा निर्णय घेतल्यानंतर, कृष्णप्रकाश यांनी ऑनलाईन रजिस्टर केलं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांच्याकडे स्पर्धेच्या तयारीसाठी केवळ साडेतीन महिने होते. यामध्ये त्यांना धावणे, सायकलिंग आणि स्विमिंग या सर्व पातळ्यांवर तयारी करायची होती. आयजी ते आयर्नमॅन, IPS कृष्णप्रकाश यांच्याकडून अवघड ट्रायथलॉन पूर्ण! कृष्णप्रकाश रात्री दहाला झोपून पहाटे चार वाजता उठून प्रॅक्टिस सुरु करत असत. रविवारी तर दह-बारा तास ते सरावच करत. सर्व तयारीनंतर ते ऑगस्ट महिन्यात फ्रान्समध्ये पोहोचले. तिथेही स्पर्धेच्या आधी त्यांनी सराव केला. मात्र थकवा जाणवू नये, यासाठी त्यांनी कवितांचा आधार घेतला. त्यांनी स्वत: कविता लिहिल्या. चाक खड्ड्यात गेलं, कृष्णप्रकाश कोसळले या स्पर्धेत 180 किलोमीटर सायकलिंग करायचं असतं. सायकलिंग करत असताना कृष्णप्रकाश यांच्या सायकलचं चाक खड्ड्यात गेलं आणि ते जमिनीवर कोसळले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने ते काही क्षण त्यांना भोवळ आल्यासारखं झालं. त्यावेळी सहकारी सायकलपटूंनी त्यांच्या तोंडावर पाणी मारुन उठवलं. मग कृष्णप्रकाश यांनी पुन्हा सायकलिंग सुरु केलं. मात्र त्याचवेळी त्यांच्यापुढे वेळेचं आव्हान होतं. कारण स्पर्धेच्या नियमानुसार तुम्ही एकाच स्पर्धकाच्या मागे सलग 12 मिनिटे राहू शकत नाही. त्यामुळे कृष्णप्रकाश हे एकामागोमाग एकाला ओव्हरटेक करत गेले. संबंधित बातमी

सुपरमॉडेल मिलिंद सोमण आता 'आयर्नमॅन', सर्वात अवघड 'ट्रायथलॉन'चं जेतेपद 

https://twitter.com/IRONMANtri/status/915607537038315520
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget