एक्स्प्लोर
Advertisement
Mark Zuckerberg | आज 'झुक्याबाबा'चा बर्थडे, जाणून घ्या मार्क झुकरबर्गविषयी 'या' रंजक गोष्टी
फेसबुक (Facebook) चे संस्थापक मार्क झुकरबर्ग 36 वर्षांचा झाला आहे. हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्कने आपल्या मित्रांसोबत फेसबुकची स्थापना केली.
मुंबई : जगातली सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी फेसबुक (Facebook) चे संस्थापक मार्क झुकरबर्ग 36 वर्षांचा झाला आहे. मार्क इलियट झुकरबर्ग (Mark Zuckerberg) चा जन्म 14 मे 1984 साली झाला. झुकरबर्गचा जन्म न्यूयॉर्क येथील व्हाइट प्लेन्स येथे झाला. त्याचे वडील के.एम. केम्नर मानसोपचार तज्ञ तर आई एडवर्ड झुकरबर्ग ही डेंटिस्ट आहे. आज फेसबुकने अख्ख्या जगाला वेड लावलं आहे. सोशल मीडियाच्या महत्वाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम हे तिन्ही प्लॅटफॉर्मवर झुकरबर्गचीच मालकी आहे.
हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्कने आपले वर्गमित्र डस्टिन मोस्कोविट्ज, एड्युअर्डो सार्विन आणि ख्रिस ह्युजेस यांच्या सोबत फेसबुकची स्थापना केली. सध्या मार्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वलस्थानी आहे. त्याने माउंटन व्ह्यू ह्या शहरामध्ये मुख्यालय असलेल्या व्हॉट्सॲपला 2014 साली फेसबुक कंपनीने विकत घेतले. इन्स्टाग्राम आणि ऑकुलस व्ही आर पण फेसबुकच्या नावाखाली आले आहेत.
झुकरबर्ग संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी
- झुकरबर्ग 23 वर्षाच्या वयात अब्जाधीश झाला होता.
- त्याला लहानपणापासूनच कम्प्यूटरची आवड होती. त्याच्या वडिलांनी त्याला C++ ची पुस्तकं भेट दिली होती. य़ा पुस्तकांनी त्याचं जीवन बदलून गेलं.
- लहानपणी मार्क ने एक मॅसेजिंग प्रोग्राम बनवला होता ज्याचा वापर त्याचे वडील आपल्या दवाखान्यात करायचे.
- 17 वर्षाचा असताना झुकरबर्गनं एक सिनेप्स मीडिया प्लेअर बनवला होता.
- हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्कने आपले वर्गमित्र डस्टिन मोस्कोविट्ज, एड्युअर्डो सार्विन आणि ख्रिस ह्युजेस यांच्या सोबत फेसबुकची स्थापना केली.
- फेसबुकचं हेड ऑफिस अमेरिकेतील कॅलिफोर्नियात आहे.
- 2010 मध्ये टाईम मासिकाने त्याला पर्सन ऑफ द इयरच्या पुरस्कार दिला होता. जगातील 100 श्रीमंत आणि सर्वात प्रभावशाली लोकांमध्ये झुकरबर्ग यांचा समावेश केला आहे.
- डिसेंबर 2016 मध्ये फॉरबसच्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत झुकेरबर्ग 10 व्या स्थानावर होता.
- 2018 मध्ये भागीदारांनी सीईओ झुकरबर्गला चेअरमनपदावरुन हटवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. अनेक हाय प्रोफाईल घोटाळे समोर आल्यानंतर झुकरबर्गला पदावरुन काढून टाकण्याची मागणी केली होती.
- इलियॉनिस, ऱ्होड आयलंड, पेन्सिवेनिया आणि न्यू यॉर्क सिटी कंप्ट्रोलर स्कॉट स्ट्रिंगरने एकत्रितपणे हा प्रस्ताव ठेवला आहे. अशाप्रकारचा प्रस्ताव 2017 मध्ये धुडकावण्यात आला होता. झुकरबर्गकडे फेसबुकचे सर्वाधिक शेअर्स आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement