एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आता बस झालं, आयसिसला अमेरिकेत घुसू देणार नाही : ट्रम्प
या हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र शब्दात हल्ल्याचा निषेध केला आहे.
न्यूयॉर्क : दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिका पुन्हा हादरली. न्यूयॉर्कच्या लोअर मॅनहॅटनमध्ये एक भरधाव ट्रक सायकल लेनमध्ये घुसून पादचाऱ्यांना चिरडलं. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आणि 11 लोक जखमी झाले आहेत.
आता बस झालं!
या हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र शब्दात हल्ल्याचा निषेध केला आहे. "आता बस झालं, आखाती देश आणि इतरत्र आयसिसला नामोहरम केल्यानंतर त्यांना अमेरिकेत घुसू देणार नाही," असं ट्वीट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.
https://twitter.com/realDonaldTrump/status/925490503218589696
"या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे. देव आणि तुमचा देश तुमच्यासोबत आहे," असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
https://twitter.com/realDonaldTrump/status/925497025386500096
न्यूयॉर्यचे लोक धैर्यशील, संयम सोडणार नाहीत : महापौर
हा भ्याड हल्ला असून निरपराधांना लक्ष्य केल्याची प्रतिक्रिया न्यूयॉर्कचे महापौर बिल डे ब्लेसियो यांनी दिली आहे. "आमचं धैर्य कमी करणं हा या हल्ल्यांमागचा उद्देश असतो. पण न्यूयॉर्कचे लोक धैर्यशील आहेत आणि ते संयम सोडणार नाहीत," असं बिल डे ब्लेसियो म्हणाले.
https://twitter.com/NYCMayor/status/925474877443854343
अमेरिकेत दहशतवादी हल्ला, ट्रकने चिरडल्याने 8 जणांचा मृत्यू
पंतप्रधान मोदींकडूनही शोक व्यक्त
दुसरीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही न्यूयॉर्कमधील हल्ल्याचा निषेध केला. मृतांच्या परिवाराच्या आणि जखमींच्या दु:खात मी सहभागी आहे, असं ट्वीट मोदींनी केलं आहे.
https://twitter.com/narendramodi/status/925546219946029057
रस्त्यावर नेमकं काय घडलं?
सेफुलो सायपोव असं 29 वर्षीय दहशतवाद्याचं नाव आहे. सेफुलो 2010 मध्ये अमेरिकेत आला होता. स्थानिक वेळेनुसार दुपारी तीनच्या सुमारास सेफुलो पिकअप ट्रक घेऊन सायकल आणि फूटपाथच्या लेनमध्ये घुसला आणि अनेकांना चिरडत निघाला. यानंतर या ट्रकने स्कूलबसला धडक दिली. यात दोन ज्येष्ठ नागरिकांसह दोन मुलं जखमी झाले. यानंतर ट्रक थांबला.
सेफुलो दोन हॅण्डगन घेऊन ट्रकमधून उतरला आणि घोषणा देऊ लागला. यानंतर घटनास्थळावर असलेल्या पोलिस अधिकाऱ्याने त्याच्यावर गोळी झाडली, जी त्याच्या पोटात घुसली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement