एक्स्प्लोर
बायकोची बडबड टाळण्यासाठी पतीकडून 62 वर्षं मूकबधीर असल्याचं सोंग
62 वर्षांपूर्वी डोरोथी आणि बेरी विवाहबंधनात अडकले होते. या सहा दशकांच्या कालावधीत मिस्टर बेरी यांनी पत्नीसमोर एक अवाक्षरही काढलं नाही. इतकी वर्ष त्यांनी आपण मूकबधीर असल्याचं सर्वांना भासवलं होतं.
न्यूयॉर्क : अमेरिकेतील एका वृद्ध दाम्पत्याने 62 वर्षांच्या सहजीवनानंतर घटस्फोटासाठी न्यायालयाची दारं ठोठावली आहेत. दोघांचा संसार ज्यावर उभा राहिला, तो विश्वासाचा पायाच पोकळ असल्याचं महिलेच्या लक्षात आलं. पतीने तिच्या पश्चात विवाहबाह्य प्रेमसंबंध ठेवून फसवणूक केली नाहीये! तर वर्षानुवर्ष चक्क बहिरा असल्याचं ढोंग केलं.
अमेरिकेतील कनेक्टिकटमधील वॉटरबरी शहरात ही अनोखी घटना घडली आहे. 80 वर्षांच्या डोरोथी यांनी 84 वर्षीय पती बेरी डावसन यांच्यापासून काडीमोड घेण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. घटस्फोटाचं कारण ऐकून कोर्टही अवाक झालं.
62 वर्षांपूर्वी डोरोथी आणि बेरी विवाहबंधनात अडकले होते. या सहा दशकांच्या कालावधीत मिस्टर बेरी यांनी पत्नीसमोर एक अवाक्षरही काढलं नाही. इतकी वर्ष त्यांनी आपण मूकबधीर असल्याचं सर्वांना भासवलं होतं.
पतीची भाषा समजावी, यासाठी डोरोथी आणि त्यांची मुलं सांकेतिक भाषा शिकल्या. तरीही पती आपल्याशी फार संवाद साधत नसल्याची खंत डोरोथी यांच्या मनात होती.
बेरी आणि डोरोथी यांना सहा मुलं, सूना-जावई आणि 13 नातवंडं आहेत. बेरी आजोबांना बोलता-ऐकता येत नाही, यावर सर्वांचा विश्वास बसला होता. मात्र एके दिवशी त्यांचं बिंग फुटलं आणि अख्ख्या कुटुंबाच्या मनात विश्वासघाताची भावना निर्माण झाली.
बायकोचं ऐकावं लागू नये, म्हणून बेरी यांनी मूकबधीर असल्याचं सोंग घेतलं होतं. 62 वर्ष ते त्यांच्या शरीरात इतकं भिनलं, की कोणालाच त्यांच्या खोटारडेपणाची शंकाही आली नाही. मात्र अचानक वस्तुस्थिती समोर आली आणि पत्नीला विभक्त होण्यावाचून पर्याय दिसेनासा झाला.
आपल्या पत्नीला दुखावण्याचा किंवा फसवण्याचा बेरी यांचा हेतू नव्हता, हेच त्यांच्या 62 वर्षांच्या संसाराचं गुपित आहे, असा दावा बेरी यांच्या वकिलाने कोर्टात केला. मात्र डोरोथी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यांनी मानसिक त्रास झाल्याबद्दल नुकसान भरपाई, पोटगी आणि काही वस्तूंची मागणी केली आहे. आता कोर्टात समोरासमोर आल्यावर दोघं काय 'बोलणार' याची कोर्टालाही उत्सुकता असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement