Mali Bus Accident : बस पुलावरून कोसळून मोठी दुर्घटना! भीषण अपघातात 31 जणांचा मृत्यू
Road Accident in Mali : मालीमध्ये भीषण बस अपघातात 31 जणांचा मृत्यू झाल्याची मोठी बातमी समोर येत आहे.
Mali Road Accident : आफ्रिकन देश माली (Mali) येथे मोठी बस दुर्घटना घडली आहे. मालीमध्ये भीषण बस अपघातात 31 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर सुमारे 10 जण जखमी झाले आहेत. मालीमध्ये मंगळवारी हा भीषण अपघात घडल्याची माहिती आहे. भीषण बस अपघातात 31 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस नदीवरील पुलावरून पडली.
मालीमध्ये भीषण बस अपघात
ही घटना मालीच्या पश्चिमेकडील शहरातील केनिबा येथे घडली आहे. या अपघातात 10 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. परिवहन मंत्रालयाने या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, मंगळवारी 27 फेब्रुवारीला मालीमध्ये बस अपघातात 31 जणांचा मृत्यू झाला आणि 10 जण जखमी झाले आहेत.
31 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी
मीडिया रिपोर्टनुसार, माली येथे मंगळवारी झालेल्या बस अपघातात 31 जणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम शहरातील केनिबा येथे नदीवरील पुलावरून बस खाली पडल्याची घटना घडली आहे. या अपघातात 10 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. या घटनेची परिवहन मंत्रालयाने पुष्टी केली आहे.
नेमका कसा घडला अपघात?
बुर्किना फासोच्या दिशेने जाणारी बस देशाच्या दक्षिण-पूर्वेकडील पुलावरून पडल्याने हा अपघात झाला. स्थानिक वेळेनुसार, मंगळवारी सायंकाळी 5 वाजता हा अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.
माळीमध्ये सतत रस्ते अपघात सुरुच
मंत्रालयाने दिलेल्या माहिती, बागो नदी ओलांडणाऱ्या पुलावर सायंकाळी 5 वाजता हा अपघात झाला. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असं अपघातामागील संभाव्य कारणंही सांगितलं जात आहे. माळी येथे वारंवार रस्ते अपघात होत असतात. देशातील अनेक रस्ते, महामार्ग आणि वाहनांची दुरवस्था झाली आहे.
बस आणि ट्रकची धडक होऊन अपघात
या महिन्याच्या सुरुवातीला, बस आणि ट्रकची धडक होऊन अपघात झाला होता. मध्य माली येथे राजधानी बामाकोकडे जाणारी बस एका ट्रकला धडकल्याने 15 लोकाचा मृत्यू झाला होता आणि 46 जखमी झाले. दोन्ही वाहने विरुद्ध दिशेने जात होती. आफ्रिकेमध्ये रस्ते अपघाताचं प्रमाण खूप जास्त आहे. जगभरातील रस्ते वाहतूक मृत्यूंपैकी जवळपास एक चतुर्थांश मृत्यू आफ्रिकेत होतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Mumbai Fire : भाईंदरमध्ये अग्नितांडव! आझाद नगर झोपडपट्टीला भीषण आग, एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी