एक्स्प्लोर
Advertisement
बायको-मुलासह ल्यूक एकिन्सची पॅराशूटविना 25 हजार फुटावरुन उडी
हॉलिवूड स्टंटमॅन आणि स्कायडायव्हर ल्यूक एकिन्स यानं कॅलिफोर्नियातल्या सिमी व्हॅली भागात 25 हजार फूट उंचीवरुन खाली उडी मारली.
पॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा एका नवा विश्वविक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आला आहे. हॉलिवूड स्टंटमॅन आणि स्कायडायव्हर ल्यूक एकिन्स यानं कॅलिफोर्नियातल्या सिमी व्हॅली भागात 25 हजार फूट उंचीवरुन खाली उडी मारली.
विशेष म्हणजे ही उडी मारताना सुरक्षेसाठी वापरलं जाणारं पॅराशूट वापरलं नव्हतं. सुदैवानं उडी मारल्यानंतर ल्यूक जमिनीपासून 200 फूट उंचीवर बांधलेल्या सुरक्षेच्या जाळीत जाऊन पडला.
त्यामुळे इतक्या उंचीवरुन विनापॅराशूट उडी मारल्यानं ल्यूकची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. विशेष म्हणजे ल्यूकचा हा स्टंट 10 लाखांहून अधिक जणांनी लाईव्ह बघितला.
ल्यूकने 30 जुलैला ही कामगिरी केली. कॅलिफोर्नियातील सिमी व्हॅलीजवळ हा थरार असंख्य लोकांनी लाईव्ह अनुभवला.
महत्त्वाचं म्हणजे ल्यूक एकिन्ससोबत त्याची पत्नी आणि मुलानेही पहिल्यांदाच विना पॅराशूट उडी मारली.
सुरक्षेसाठी ल्यूकने जे नेट लावलं होतं, ते हायडेंसिटी पॉलिथायलेन अर्थात स्टीलपेक्षाही मजबूत आहे. या नेटमध्ये चार एयर सिलेंडर लावण्यात आले होते. त्यामुळे ल्यूक एकिन्सचा वेग कमी झाला आणि तो सुरक्षित लँड झाला.
ल्यूक एक व्यावसायिक स्कायडायव्हर आहे. त्याला त्याबाबतची सर्व तांत्रिक माहिती आहे. त्यामुळे तज्ज्ञ असलेल्या ल्यूकने हा विक्रम आपल्या नावे केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement