एक्स्प्लोर
'ही' तरुणी इस्रायलमध्ये मोदींचं स्वागत करणार!
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 जुलैपासून दोन दिवसीय इस्रायल दौऱ्यावर जाणार आहेत. मोदी इस्रायल दौरा करणारे भारताचे पहिले पंतप्रधान असतील. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजॅमिन नेत्यान्याहू द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
इस्रायलमध्ये पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याबाबत मोठी उत्सुकता आहे. इस्रायल मीडियाच्या वृत्तांनुसार मोदींच्या स्वागत समारंभात भारताचं राष्ट्रगीत गाण्याचा मान भारतीय वंशाची गायिका लियोरा इतझाकला देण्यात आला आहे.
कोण आहे लियोरा आयझॅक?
लियोराचे आई-वडील मूळ मुंबईचे आहेत. मात्र तिचा जन्म इस्रायलमध्ये झाला. वयाच्या 15 व्या वर्षी लियोरा शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी भारतात आली. पुण्यातून लियोराने शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. लियोराला दिल का डॉक्टर या बॉलिवूड सिनेमातही गाण्याची संधी मिळाली होती. आठ वर्षे भारतात राहिल्यानंतर तिने आई-वडिलांकडे जाण्याचा निर्णय घेतला. वयाच्या 23 व्या वर्षी लियोरा इस्रायलला परतली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement