एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kim Jong | उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन जिवंत, दक्षिण कोरियाचा दावा
काही दिवसांपासून किम जोंग उन यांच्या प्रकृतीबद्दल उलट सुलट बातम्या येत होत्या. मात्र आता उत्तर कोरियाचा दुष्मन मानला जाणारा आणि त्यांचा शेजारी दक्षिण कोरियाकडूनच ते जिवंत आहेत असा दावा केला गेला आहे.
नवी दिल्ली : उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन ब्रेन डेड झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र उत्तर कोरियानंतर आता दक्षिण कोरियाने देखील हे वृत्त फेटाळले आहे. हे जिवंत असून त्यांची प्रकृतीही उत्तम असल्याची माहिती दक्षिण कोरियाकडून देण्यात आली आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जी यांचे परराष्ट्र विषयांचे सल्लागार मून चंग इन यांनी सांगितलं आहे की, किम जोंग उन यांची प्रकृत्ती उत्तम आहे आणि ते जिवंत आहेत. ते 13 एप्रिलपासून वॉनसन या ठिकाणी वास्तव्यास आहेत.
याआधी किम जोंग यांच्या मृत्यूबाबतचे वृत्त उत्तर कोरियाने फेटाळले होते. देशाचा कारभार सुरळीत सुरू आहे असे उत्तर कोरियाच्या सरकारी प्रवक्त्याने सांगितले होते. पण किम जोंग यांच्या प्रकृतीविषयी जास्त माहिती देणे टाळले होते. किमच्या तब्येतीविषयी काही अफवा उडवल्या जात आहे पण त्यात तथ्य नाही, असे प्रवक्त्याने सांगितले होते.
गेल्या काही दिवसांपासून किम जोंग उन यांच्या प्रकृतीबद्दल उलट सुलट बातम्या येत होत्या. मात्र आता थेट त्यांच्या शेजारी आणि उत्तर कोरियाचा दुष्मन मानला जाणाऱ्या दक्षिण कोरियाकडूनच ते जिवंत आहेत असा दावा केला गेला आहे.
अजब आणि टोकाचे निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग नेहमी चर्चेत असतात. उत्तर कोरियामध्ये कोरोना व्हायरस पसरू नये यासाठी त्यांनी एक वादग्रस्त निर्णय घेतला होता. त्याची जगभरात चर्चा झाली होती. 'इंटरनॅशनल बिझनेस टाईम्स'च्या रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरस उत्तर कोरियामध्ये पसरु नये यासाठी कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळल्यास त्याच्यावर उपाचार करण्याआधी त्याला थेट गोळ्या झाडण्याचे आदेश किम जोंग यांनी दिले होते.
उत्तर कोरियातील एक व्यावसायिक कामानिमित्त चीनमध्ये गेला होता. तेथे त्याला कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याचं निष्पन्न झालं होतं. चीनमधून परतल्यानंतर या व्यक्तीकडून इतर नागरिकांना धोका निर्माण होऊ नये, म्हणून त्या व्यावसायिकाला गोळ्या घालण्याचे आदेश किम जोंग यांनी दिले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement