Corona Vaccine | लस सिंगल डोसमध्ये 66 टक्के तर गंभीर आजारामध्ये 85 टक्के प्रभावी, जॉन्सन अॅन्ड जॉन्सन कंपनीचा दावा
अमेरिकेतल्या जॉन्सन अॅन्ड जॉन्सन (Johnson & Johnson vaccine) या कोरोना लस निर्मीत कंपनीने दावा केला आहे की त्यांची लस ही जगभरात 66 टक्के प्रभावी आहे. अमेरिकेत त्याचा प्रभाव 72 टक्के आहे तर गंभीर आजारासंबंधी ही लस 85 टक्के प्रभावी आहे.
वॉशिंग्टन: कोरोना विरोधात अमेरिकेत आणखी एक लस लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. अमेरिकन लस निर्मीती कंपनी जॉन्सन अॅन्ड जॉन्सनने दावा केला आहे की त्यांची लस ही अमेरिकेत 72 टक्के तर जगभरात 66 टक्के प्रभावी आहे. गंभीर आजारासंबंधी विचार केला तर या कंपनीची लस ही 85 टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 44 हजार लोकांवरती या लसीचा प्रयोग करण्यात आला आहे.
या कंपनीने स्पष्ट केलं आहे की लसीचा सिंगल डोस हा ट्रायलच्या दरम्यान 66 टक्के प्रभावी असल्याचं दिसून आलाय. या आधी जॉन्सन अॅन्ड जॉन्सन कंपनीने त्यांची लस ही 94 टक्के प्रभावी असल्याचं सांगितलं होतं. त्यावर बोलताना कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे की अमेरिकेत आणि आफ्रिकेच्या काही देशांत या लसीचा प्रभाव हा 72 टक्के आहे. तर गंभीर रुग्णांच्या बाबतीत या लसीचा प्रभाव हा 85 टक्के इतका आहे. यामध्ये एकाही व्यक्तीचा जीव गेला नसल्याचंही कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय.
Covid-19 Guidelines | केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन्स जारी, पाहा काय सुरु, काय बंद?
या लसीचे वैशिष्ट्य म्हणजे याचा सिंगल डोस हा 66 टक्के प्रभावी असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे केवळ एक डोसमध्ये कोरोनापासून सुरक्षा मिळू शकते असा दावा कंपनीच्या वतीनं करण्यात आला आहे. दोन डोसच्या लसीइतकं प्रबळ नसले तरी याचा एक डोस हा आवश्यक ती सुरक्षा प्रदान करु शकतो असाही दावा कंपनीने केला आहे. कंपनीच्या वतीनं घेण्यात आलेल्या ट्रायलच्या परिणामांची शुक्रवारी माहिती देण्यात आली.
कंपनीच्या मते, या लसीचा वेगवेगळ्या देशांत वेगवेगळा परिणाम दिसून आलाय. अमेरिकेत याचा परिणाम चांगला दिसून आला आहे. तसेच आफ्रिकेतील सात देशांतही चांगला प्रभाव दिसून आला असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलंय.
कंपनीनं सांगितलं आहे की येत्या आठवड्याभरात अमेरिकन सरकारकडे या लसीच्या इमर्जन्सी वापराची विनंती करण्यात येईल. त्यानंतर जगातल्या विविध देशांमध्येही ही प्रक्रिया पार पाडण्यात येईल. अमेरिकेत मंजुरी मिळाल्यानंतर याचे वितरण सुरु करण्यात येईल.
Corona Vaccine | कोरोना लसीची खुल्या बाजारात विक्री नाही, केंद्रीय आरोग्य सचिवांचे स्पष्टीकरण