(Source: Poll of Polls)
Guinness World Records: एकाच कंपनीत केली 84 वर्षे नोकरी, 'या' 100 वर्षांच्या वृद्धाने केला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
Longest Career In The Same Company: गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने जाहीर केले आहे की, ब्राझीलमधील एका सेल्समनने एकाच कंपनीत सर्वाधिक काळ काम केल्याचा अधिकृत विक्रम केला आहे.
Longest Career In The Same Company: जर तुम्हाला तुमच्या कामाचा कंटाळा येत असेल आणि तुम्हाला असे वाटत असेल की, तुम्ही खूप दिवसांपासून तेच काम करत आहात, तर 100 वर्षीय वॉल्टर ऑर्थमन यांना पाहून तुमचा विचार बदलू शकतो. कारण ते गेल्या 84 वर्षांपासून एकाच कंपनीत काम करत आहेत.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने जाहीर केले आहे की, ब्राझीलमधील एका सेल्समनने एकाच कंपनीत सर्वाधिक काळ काम केल्याचा अधिकृत विक्रम केला आहे. ऑर्थमन यांनी एकाच कापड कंपनीत आपल्या आयुष्यातील आठ दशक घालवली आहेत. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने सांगितले की, वॉल्टर हे 17 वर्षाचे होते, जेव्हा त्यांनी या कंपनीत नोकरी करण्यास सुरुवात केली.
शिपिंग असिस्टंट म्हणून नोकरीची केली सुरुवात
ऑर्थमन यांनी इंडस्ट्रियास रेनॉक्स एसए येथे शिपिंग असिस्टंट म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली, ज्याचे नाव आता रेनॉक्स व्ह्यू आहे. दुसरे महायुद्ध सुरू होण्याच्या एक वर्ष आधी त्यांनी या कंपनीत कामाला सुरुवात केली. होती. ते आजही याच क्षेत्रात आणि याच कंपनीत काम करत आहेत.
हे आहे चांगल्या करिअरचे रहस्य
ऑर्थमन यांच्या या विलक्षण कारकीर्दीचे रहस्य काय आहे? याबाबत बोलताना ऑर्थमन यांनी सांगितले की, "मी उद्याची फारशी योजना आखत नाही किंवा फारशी काळजी करत नाही. मला फक्त एवढीच काळजी आहे की, उद्या दुसरा दिवस येईल ज्यामध्ये मी उठेन, व्यायाम करेन आणि माझ्या कामावर जाईन. तुम्ही तुमच्या वर्तमानात व्यस्त राहायला हवं. भूतकाळात किंवा भविष्याची चिंता न करता, आपल्याला आज जे काम आहे, ते पूर्ण करायला हवं.''
वॉल्टर ऑर्थमन 19 एप्रिल 2022 रोजी 100 वर्षांचे झाले. त्यांनी त्यांचे शताब्दी वर्ष त्यांचे सहकारी, मित्र आणि कुटुंबासह अविस्मरणीय पार्टी करत साजरे केले. उत्कृष्ट मानसिक स्पष्टता आणि स्मरणशक्तीसह त्यांची तब्येत चांगली आहे. ते शांत जीवनाचा आनंद घेत दररोज व्यायाम करतात. तसेच आजही न चुकता ते वेळेवर आपल्या कामावर जातात.