Taiwan Earthquake: मोठी बातमी! तैवान भूकंपानं हादरला, रिश्टर स्केलवर तीव्रता 7.5, जपानकडून त्सुनामीचा इशारा
Japan Tsunami Alert: तैवानची राजधानी तैपेई येथे बुधवारी (3 एप्रिल) सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.5 इतकी मोजली गेली.
Japan Tsunami Alert: नवी दिल्ली : चीनच्या (China) शेजारी असलेल्या तैवान (Taiwan Earthquake) देशात 7.7 तीव्रतेचा भीषण भूकंप (Earthquake Updates) झाला आहे. यामध्ये अनेक इमारती कोसळल्या आहेत. अधिक चिंतेचं कारण म्हणजे, तैवान, जपानचा (Japan) ओकिनावा परिसर आणि फिलीपाईन्समध्ये (Philippines) त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. पूर्व तैवानमध्ये भूकंप आल्यानं तिथं इंटरनेट सेवा देखील बंद पडली आहे. तैवानमधला गेल्या 25 वर्षातला हा सर्वात भीषण भूकंप आहे. सप्टेंबर 1999 मध्ये 7.6 तीव्रतेच्या भूकंपात 2 हजार 400 जणांचा मृत्यू झाला आहे.
तैवानची राजधानी तैपेई येथे बुधवारी (3 एप्रिल) सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.5 इतकी मोजली गेली. तैवानमध्ये मोजण्यात आलेली 7.5 रिश्टर स्केलची तीव्रता धोकादायक श्रेणीत मोडते. तैवान सेंट्रल वेदर ॲडमिनिस्ट्रेशननं ही माहिती दिली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, तैपेईच्या अनेक भागांत वीज गेली. भूकंपानंतर लगेचच शेजारील देश जपान सतर्क झाला आणि त्सुनामीचा इशारा दिला. लोकांना सखल भाग सोडून उंच ठिकाणी जाण्यासही सांगण्यात आलं आहे.
भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे कोणीही ठार झाल्याची किंवा जखमी झाल्याची कोणतीही बातमी अद्याप मिळालेली नाही. मात्र, सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओंमध्ये भूकंपामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन आणि इमारती कोसळल्याच्या बातम्या आहेत. व्होल्कॅनो डिस्कवरीच्या अहवालानुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची खोली 35 किमी होती आणि देशाच्या मोठ्या भागात हा धक्का जाणवला. भूकंपाची खोली जास्त असल्यानं त्याच्या केंद्रस्थानी जोरदार धक्के जाणवले आहेत.
अंगावर शहारे आणणारे तैवानमधील भूकंपाचे व्हिडीओ
BREAKING: Massive land-sliding after earthquake in Taiwan that is reported to be strongest in 25 years
— Insider Paper (@TheInsiderPaper) April 3, 2024
pic.twitter.com/4twfZfEltn
BREAKING: Massive shaking on flyover/road amid massive earthquake in Taiwan pic.twitter.com/3k7fOtHt0k
— Insider Paper (@TheInsiderPaper) April 3, 2024
BREAKING: Houses and buildings damaged and collapsed in Taiwan after massive earthquake pic.twitter.com/ZUAwT2P0PV
— Insider Paper (@TheInsiderPaper) April 3, 2024
सीएनएनच्या रिपोर्टनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू हुआलियन शहराच्या दक्षिणेला सुमारे 18 किलोमीटर अंतरावर होता. तैवानच्या सेंट्रल वेदर ॲडमिनिस्ट्रेशननंही भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा दिला आहे. CWA नं रहिवाशांना त्सुनामीचा इशारा दिला आहे. उत्तरेकडील किनारपट्टी भागांत सुनामी येऊ शकते, असं सांगण्यात आलं आहे. लोकांना ताबडतोब उंचावरील भागात जाण्यास सांगण्यात आलं आहे. 7.5 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर आणखी अनेक धक्के जाणवले आहेत. यापैकी काही भूकंप 6.5 तीव्रतेचे होते.
जपानमध्ये त्सुनामीचा इशारा
तैवानचा शेजारी देश जपाननंही भूकंपाच्या जोरदार धक्क्यानंतर त्सुनामीचा इशारा दिला आहे. जपानच्या मेट्रोलॉजिकल एजन्सीनं त्सुनामीच्या लाटा 3 मीटर (10 फूट) उंचीपर्यंत येण्याचा इशारा दिला आहे. जोरदार भूकंपानंतर जपानला कोणताही धोका पत्करायचा नाही. त्सुनामीचा इशारा जारी केल्यामुळे, लोकांना ओकिनावाच्या दक्षिणेकडील किनारपट्टीच्या भागांपासून दूर राहण्यास सांगण्यात आलं आहे. जपानचं मियाकोजिमा बेट तैवानजवळ आहे.
तैवान पॅसिफिक महासागराच्या 'रिंग ऑफ फायर' जवळ स्थित आहे. या भागात नेहमीच भूकंपाचे धक्के जाणवत असतात. 'रिंग ऑफ फायर' प्रशांत महासागराच्या किनाऱ्यापासून सुरू होतं आणि दक्षिण अमेरिकेतील चिली या देशापर्यंत पसरतं. त्यामुळे इंडोनेशियापासून चिलीपर्यंत नेहमीच भूकंपाचे तीव्र धक्के जाणवतात. 2018 मध्ये, हुआलियन शहरात 6.2 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामध्ये 17 लोकांचा मृत्यू झाला, तर 300 लोक जखमी झाले. 1999 च्या भूकंपात 2400 लोकांचा मृत्यू झाला होता.