Italy PM Giorgia Meloni Splits From Partner : भारतात जी 20 परिषदेत जोरदार हवा केलेल्या इटलीच्या पीएम जाॅर्जिया मेलोनींचा घटस्फोट! विभक्त होण्याचे कारणही धक्कादायक
मेलोनी यांनी सोशल मीडिया ट्विटर अकाउंटवरुन सांगितले की, गेल्या 10 वर्षांपासून माझं आंद्रिया जिआम्ब्रुनोसोबतचे नातं इथं संपत आहे. आमचे मार्ग काही काळासाठी वेगळे झाले आहेत.
रोम (इटली) : इटालियन पंतप्रधान ज्योर्जिया मेलोनी (Italian Prime Minister Giorgia Meloni) यांनी पती टेलिव्हिजन पत्रकार आंद्रेया जिआमब्रुनोपासून (Andrea Giambruno) घटस्फोट घेण्याची घोषणा केली आहे. पत्रकार आंद्रेया यांनी अलीकडील आठवड्यात ऑन एअर आणि ऑफ एअर केलेल्या अश्लील आणि लैंगिक टिप्पण्यांमुळे सडकून टीका झाली होती. मेलोनी यांनी सोशल मीडिया ट्विटर अकाउंटवरुन सांगितले की, गेल्या 10 वर्षांपासून माझं आंद्रिया जिआम्ब्रुनोसोबतचे नातं इथं संपत आहे. आमचे मार्ग काही काळासाठी वेगळे झाले आहेत आणि ते कबूल करण्याची वेळ आली आहे. या जोडप्याला सात वर्षांची मुलगी आहे.
La mia relazione con Andrea Giambruno, durata quasi dieci anni, finisce qui. Lo ringrazio per gli anni splendidi che abbiamo trascorso insieme, per le difficoltà che abbiamo attraversato, e per avermi regalato la cosa più importante della mia vita, che è nostra figlia Ginevra.… pic.twitter.com/1IpvfN8MgA
— Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) October 20, 2023
जिआमब्रुनो हे माजी पंतप्रधान आणि मेलोनी सहयोगी दिवंगत सिल्व्हियो बर्लुस्कोनी यांच्या वारसांच्या मालकीच्या MFE मीडिया समूहाचा भाग असलेल्या Mediaset द्वारे प्रसारित केलेल्या वृत्त कार्यक्रमाचा अँकर आहे.
मीडियासेट शोमध्ये प्ले केलेल्या पहिल्या ऑफ-एअर रेकॉर्डिंगमध्ये, अँड्रियाने एका महिला सहकाऱ्याकडे तिच्या केशरचनाबद्दल केलेल्या टीकेबद्दल तक्रार केली. मग तो त्यांना विचारतो, 'मी तुम्हाला आधी का भेटले नाही?' दुसऱ्या रेकॉर्डिंगमध्ये, तो एका महिला सहकाऱ्याला सांगताना ऐकू येतं की शोमध्ये दुसरी अँकर घ्यायला हवी, ते म्हणतात, 'आम्ही Threesome किंवा Foursome करु.' सप्टेंबरमध्येही अँड्रियाने एक कमेंट केली होती ज्यामुळे बराच गदारोळ झाला होता. जर महिलांना बलात्कार टाळायचा असेल तर त्यांनी दारू पिणे टाळावे, असे ते म्हणाले होते.
अनेक हायप्रोफाईल प्रकरणे उघडकीस आल्यानंतर अँड्रियाने हे कमेंट ऑन एअर केले. त्यानंतर मेलोनी जोडीदाराचा बचाव करताना दिसल्या. मेलोनी म्हणाल्या की, त्याच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला गेला. आंअँड्रियाने हवामान बदल नाकारणारी सुद्धा टिप्पणी केली होती. जुलैमध्ये जेव्हा इटलीमध्ये प्रचंड उष्मा होता, तेव्हा त्यांनी सांगितले होते की, उन्हाळ्यात गरम असणे ही बातमी नाही.
मेलोनी आणि अँड्रिया पहिल्या नजरेतच एकमेकांच्या प्रेमात पडले
अँड्रियाने एका मुलाखतीत मेलोनी यांना भेटण्याचा किस्सा शेअर केला होता. दिवसभर राजकीय सभा घेतल्यानंतर मेलोनी मुलाखतीसाठी मीडियासेट स्टुडिओत आल्याचे त्यांनी सांगितले होते. मग मेलोनी यांनी अर्धवट खाल्लेली केळी अँड्रियाला दिली. अँड्रियाने मेलोनीसोबतच्या भेटीचे वर्णन पहिल्या नजरेतील प्रेम असे केले.
मेलोनी अलीकडेच G20 शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत आल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची त्यांची मैत्री सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
इतर महत्वाच्या बातम्या