Mahua Moitra Profile: अमेरिकेत शिक्षण, कोट्यवधीच्या नोकरीवर पाणी सोडले, संसदेतील मुलुखमैदानी तोफ, अदानींवर हल्लाबोल! कोण आहेत महुआ मोईत्रा?
महुआ मोईत्रा या संसदेतील आपल्या तडाखेबाज भाषणांमुळे मुलुखमैदानी तोफ म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी लोकसभेत नेहमीच सरकारची कोंडी केली आहे. सभागृहात दिलेली त्यांची भाषणे नेहमीच व्हायरल होतात.
Mahua Moitra Profile : टीएमसी खासदार महुआ मोईत्रा संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या आरोपांवरून चर्चेत आहेत. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी त्यांच्यावर पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा आरोप केला आहे. या मुद्द्यावर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्रही लिहिले आहे. निशिकांत दुबे यांनी महुआ (Mahua Moitra) यांचे पूर्व पार्टनर जय अनंत देहदराई यांच्या पत्राच्या आधारे हे आरोप केले आणि चौकशीची मागणी केली आहे. महुआ मोईत्रा या संसदेतील आपल्या तडाखेबाज भाषणांमुळे मुलुखमैदानी तोफ म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी लोकसभेत नेहमीच सरकारची कोंडी केली आहे. सभागृहात दिलेली त्यांची भाषणे नेहमीच व्हायरल होतात. महुआ एक कुशल वक्ता आणि उत्कृष्ट नेता म्हणून ओळखल्या जातात. महुआ राजकारणात येण्यापूर्वी यशस्वी बँकर होत्या.
TMC लोकसभा खासदार महुआ मोइत्रा यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया.
अमेरिकेत शिक्षण घेतले
महुआ मोईत्रा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मतदारसंघातून टीएमसीच्या तिकिटावर विजयी झाल्या. महुआचा जन्म 1974 साली आसामच्या कछार जिल्ह्यात झाला. महुआ यांनी आपलं शिक्षण कोलकाता येथून केलं. प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर महुआ यांना त्यांच्या कुटुंबाने पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवले. 1998 मध्ये मॅसॅच्युसेट्समधीलमाउंट होल्योक कॉलेज साउथ हॅडली येथून अर्थशास्त्र आणि गणित विषयात त्यांनी पदवी प्राप्त केली.
लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये काम
शिक्षण पूर्ण केल्यानंतर महुआ यांनी प्रतिष्ठित बँकिंग कंपनी जेपी मॉर्गन चेजमध्ये काम केले. त्यांनी न्यूयॉर्क आणि लंडन या दोन्ही ठिकाणी काम केले. चांगल्या पदावर पोहोचली होती. याठिकाणी त्यांना कोट्यवधी रुपयांच्या पगारावर काम करत होत्या. जेपी मॉर्गनमध्ये काम करणाऱ्या इन्व्हेस्टमेंट बँकरचा सरासरी पगार 1.21 लाख डॉलर्सपेक्षा जास्त आहे, जो भारतीय रुपयांमध्ये एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अनुभवाने पगार कोटींमध्ये पोहोचतो.
राजकीय प्रवास कसा सुरू झाला?
लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये काम करताना महुआ यांना मजा येत नव्हती. त्यामुळे त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. 2009 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, एका वर्षातच त्यांचा काँग्रेसशी भ्रमनिरास झाला आणि 2010 मध्ये त्यांनी टीएमसीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. टीएमसीमध्ये सामील झाल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख झपाट्याने वर चढू लागला.
टीएमसीने तिला 2016 मध्ये नादिया जिल्ह्यातील करीमपूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले आणि येथून महुआ विधानसभेत पोहोचल्या. टीएमसीने त्यांची प्रतिभा ओळखली आणि त्यानंतर तीन वर्षांनंतर झालेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मतदारसंघातून तिकीट दिले. महुआ यांनी पक्षाला निराश न करता येथून विजय मिळवला. अशा प्रकारे त्या पहिल्यांदा लोकसभेत पोहोचल्या.
पतीला घटस्फोट
महुआ मोइत्रा यांनी लार्स ब्रॉर्सन या डॅनिश फायनान्सरशी लग्न केले, पण हे लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि नंतर दोघांनी एकमेकांना घटस्फोट दिला. महुआच्या आणखी एका माजी पार्टनरचे नाव सध्या चर्चेत आहे. जय अनंत देहदराई असे या व्यक्तीचे नाव असून ते सर्वोच्च न्यायालयात वकील आहेत. महुआने त्यांच्यावर मानहानीचा खटलाही दाखल केला आहे. सध्या महुआ दिल्लीत एकट्याच राहतात.
इतर महत्वाच्या बातम्या