एक्स्प्लोर

Benjamin Netanyahu : बेंजामिन नेतान्याहू सहाव्यांदा इस्रायलचे पंतप्रधान होणार, राष्ट्रपतींकडून सरकार स्थापनेसाठी आमंत्रण

Israel News : गेल्या चार वर्षांपासून इस्त्राइलमध्ये राजकीय अस्थिरता पाहायला मिळत आहे. 2019 नंतर आतापर्यंत येथे पाच वेळा निवडणुकाही झाल्या आहेत. आता पुन्हा एकदा बेंजामिन नेतान्याहू सहाव्यांदा इस्रायलचे पंतप्रधान होणार आहेत.

Benjamin Netanyahu to be Next PM of Israel : इस्रायलमध्ये ( Israel ) पुन्हा एकदा बेंजामिन नेतान्याहू ( Benjamin Netanyahu ) यांच्या बाजूने जनतेनं निकाल दिला आहे. त्यामुळे बेंजामिन नेतान्याहू पुन्हा एकदा इस्त्राइलचे पंतप्रधान ( PM of Israel ) होणार आहेत. नेतान्याहू विक्रमी सहाव्यांदा इस्त्राइलच्या पंतप्रधानपदी विराजमान होतील. इस्त्राइलचे राष्ट्रपती ( President of Israel ) आइजॅक हर्जोग ( Isaac Herzog ) यांनी बेंजामिन नेतान्याहू यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रण दिलं आहे. 1 नोव्हेंबरला निवडणुकीच्या निकालानंतर, ( Israel Election Result 2022 ) राष्ट्रपतींनी पुढील सरकार स्थापन करण्यासाठी बेंजामिन नेतान्याहू यांच्याकडे रविवारी जनादेश सुपूर्द केला आहे.

नेतान्याहू यांना राष्ट्रपतींकडून सरकार स्थापनेसाठी आमंत्रण

राष्ट्रपती कार्यालयाकडून एका निवेदनात म्हटलं आहे की, इस्रायलची संसद नेसेदच्या 64 सदस्यांचा पाठिंबा मिळविणारे नेतान्याहू यांच्याकडे पुढील सरकार स्थापन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 1 नोव्हेंबरच्या निवडणुकीत 25 व्या नेसेटसाठी निवडून आलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर राष्ट्रपतींनी नेतान्याहू यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. 

'हे सरकार स्थिर आणि यशस्वी सरकार असेल'

बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्विट करत लिहिलं की, 'निवडणूकीच्या निकालानंतर जनतेने स्पष्टपणे माझ्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याच्या बाजूने निर्णय दिला आहे. माझी शिफारस करणाऱ्या नेसेटच्या सर्व 64 सदस्यांचे मी आभार मानतो. हे सरकार स्थिर आणि यशस्वी बनवण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करु. हे एक जबाबदार आणि जनतेला समर्पित सरकार असेल. जे फक्त जनतेच्या हितासाठी काम करेल.'

गेल्या चार वर्षांपासून इस्त्राइलमध्ये राजकीय अस्थिरता पाहायला मिळत आहे. 2019 नंतर आतापर्यंत येथे पाच वेळा निवडणुकाही झाल्या आहेत. आता पुन्हा एकदा बेंजामिन नेतान्याहू सहाव्यांदा इस्रायलचे पंतप्रधान होणार आहेत.

सरकार स्थापनेसाठी नेतन्याहू यांच्याकडे 28 दिवसांचा कालावधी

इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांनी शुक्रवारी (11 नोव्हेंबर) संसदेच्या सर्व गटांशी बैठक घेतती. त्यानंतर त्यांनी नेतन्याहू यांच्या सरकार स्थापनेसाठी आमंत्रण देण्याची घोषणा केली. राष्ट्रपती हर्झोग यांनी बेंजामिन नेतन्याहू यांना जनादेश सुपूर्द केला आहे. नेतन्याहू यांच्याकडे नवीन सरकार स्थापन करण्यासाठी 28 दिवस आहेत. मात्र, इस्रायलच्या कायद्यानुसार गरज भासल्यास 14 दिवसांनी वाढवण्याचा अधिकार राष्ट्रपतींकडे आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Special Report Loksabha Election: वादग्रस्त भाषा, राजकारणाची दशा, राजकीय नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्यZero Hour ABP Majha : गावागावातील मुलींना ड्रोन पायलट करणार, Narendra Modi यांची मोठी घोषणाVidarbha SuperFast Update : विदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा : 19 एप्रिल 2024 एबीपी माझाZero Hour : Supriya Sule यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी पवार कुटुंब एकवटलं, दादा एकटे पडलेत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
''बाबासाहेब आले तरी घटना बदलणार नाही''; PM मोदींच्या विधानावर आंबेडकरांचा पलटवार
''बाबासाहेब आले तरी घटना बदलणार नाही''; PM मोदींच्या विधानावर आंबेडकरांचा पलटवार
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
Embed widget