(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Israel-Hamas War Live Updates : इस्रायल-हमास युद्धाचा 13 वा दिवस! मृतांचा आकडा 4200 पार; संघर्ष सुरुच
Israel Palestine War : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या 7 ऑक्टोबरला युद्धाला सुरुवात झाली असून संघर्ष कायम आहे. आतापर्यंत 3000 लोकांचा मृत्यू झाला आहे.
LIVE
Background
Israel Hamas Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यात युद्ध सुरु आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. या संघर्षात आतापर्यंत 4200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पॅलेस्टिनी आणि इस्रायली नागरिकांसह विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. शनिवारी, 7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलला लक्ष्य करत विविध शहरांवर हवाई, समुद्री आणि जमिनीवरून हल्ले करत युद्धाला सुरुवात केली. हमासने इस्रायलवर सुमारे 5000 हून अधिक रॉकेट डागले आहेत. इस्रायल लष्कराकडूनही हमासवर प्रतिहल्ले सुरु आहेत. इस्रायलकडून गाझातील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करुन त्यांचे तळ उदध्वस्त करण्यात येत आहेत.
Iran Ban on Israel : इराणकडून इस्रायलवर निर्बंध घालण्याची मागणी
इराणने मुस्लिम देशांना इस्रायलवर निर्बंध लादण्याचे आवाहन केले आहे. इस्लामिक देशांच्या संघटनेच्या (ओआयसी) आपत्कालीन बैठकीदरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीराबडोल्लाहियान यांनी सदस्य देशांना इस्रायलवर तेल निर्बंधासह इतर निर्बंध लादण्याची सूचना केली आहे. जेद्दाहमध्ये त्यांनी अल-अहली अरब रुग्णालयावरील प्राणघातक हल्ल्यानंतर गाझामधील संभाव्य युद्ध गुन्ह्यांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी सर्व इस्रायली राजदूतांची हकालपट्टी आणि इस्लामिक वकीलांचा एक गट स्थापन करण्याचे आवाहन केले.
Israel Palestine Conflict : हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा 13 वा दिवस
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा आज तेरावा दिवस आहे. 7 ऑक्टोबर रोजी सुरु झालेलं हे युद्ध अद्याप सुरुच आहे.
गाझासाठी अमेरिकेची 100 मिलियन डॉलरची मदत, राष्ट्राध्यक्ष बायडन यांची घोषणा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी गाझा आणि वेस्ट बँकेसाठी मदतीची घोषणा केली आहे. बायडन यांनी म्हटलं आहे की, अमेरिका गाझाच्या मदतीसाठी 100
मिलियन डॉलरची मदत देणार आहे.
Israel-Hamas War Live Updates : हमासकडून 31 अमेरिकन नागरिकांची हत्या
इस्त्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यात युद्ध सुरुच आहे. हमासकडून 31 अमेरिकन नागरिकांची हत्या करण्यात आली आहे.