Israel Attack On Gaza : ट्रम्प यांच्या मध्यस्तीला जुमानलं नाही, हमाससोबतच्या शांती कराराचं उल्लंघन, गाझावर 153 टन बॉम्ब टाकले
Israel Gaza War: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्ती करून इस्त्रायल आणि हमासमध्ये शस्त्रसंधी घडवून आणली होती. पण ही शस्त्रसंधी जास्त काळ टिकेल याची शक्यता कमी आहे.

Israel Airstrikes On Gaza : गाझामध्ये इस्त्रायल आणि हमास (Hamas) यांच्यातील संघर्ष आता आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी हमास (Hamas) विरुद्ध चालू असलेले सैन्य ऑपरेशन अजून पूर्ण झालेले नाही असा इशारा दिला. युद्धविरामामुळे हमास (Hamas) ला इस्त्रायलला धमकावण्याचा अधिकार मिळालेला नाही असंही ते म्हणाले. याच दरम्यान, इस्त्रायली सैन्याने गाझा (Gaza) मध्ये 153 टन बॉम्ब टाकले असून त्यामध्ये गाझा शहरात मोठी पडझड झाल्याचं दिसून येतंय.
Netanyahu Military Operation : सैन्य ऑपरेशन अजून पूर्ण नाही
बेंजामिन नेतन्याहू यांनी 20 ऑक्टोबर 2025 रोजी संसदेत सांगितले की, इस्त्रायच्या सैन्याने (Israeli Military) ने गाझावर 153 टन बॉम्ब टाकले आहेत. हे सर्व हमास (Hamas) च्या सीजफायर (Ceasefire) च्या उल्लंघनाच्या प्रत्युत्तरात करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. इस्त्रायलच्या एका हातात शस्त्र आहे आणि दुसऱ्या हातात शांतीचा प्रस्ताव आहे असंही ते म्हणाले.
गाझा (Gaza) मध्ये सैन्य ऑपरेशन (Military Operation) अजून पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे ट्रम्प यांच्या पुढाकाराने झालेले सीजफायर (Ceasefire) कायम राहण्यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हमासच्या आक्रमणानंतर इस्त्रायलने (Rafa) येथे हवाई हल्ले सुरू केले असं नेतन्याहू म्हणाले.
Israel Hamas Conflict : सीजफायरचे उल्लंघन, इजरायलने केले प्रत्युत्तर
हमासने आधी शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं आणि इस्त्रायलवर हल्ला केला. त्यामुळेच इस्त्रायलने प्रत्युत्तरदाखल हल्ला केल्याचा दावा पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला. यावर हमासने त्याच्या सहभागाचे खंडन केले आहे.
शस्त्रसंधी केल्यामुळे हमासला इस्त्रायलला धमकावण्याचा अधिकार मिळालेला नाही. आमच्यावर आक्रमण करणाऱ्याला मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा नेतन्याहू यांनी दिला.
Israel Hamas Agreement : इस्त्रायल-हमास करार
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या मध्यस्तीनंतर इस्त्रायल आणि हमासमध्ये शांतता करार करण्यात आला. त्यानुसार दोन्ही बाजूंनी शस्त्रसंधी करण्यात आली. हे पाऊल पश्मिच आशियातील स्थितीमध्ये मोठा बदल झाल्याचं मानलं जात आहे.
पॅलेस्टिनियन (Palestinian) लढा आणि इस्त्रायल यांच्यातील हिंसाचाराला एक मोठा धक्का देणारा हा करार होता, जो पुढील शांती प्रक्रियेसाठी एक नवा मार्ग ठरण्याची शक्यता आहे.
ही बातमी वाचा:
























