Iran Vs Israel War: इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणमध्ये विध्वंस, तीन दिवसांत 244 नागरिकांचा मृत्यू, 1200 जण जखमी
इस्त्रायलनं इराणवर तिसऱ्या दिवशी हल्ले सुरु ठेवले आहेत. इस्त्रायलनं इराणच्या संरक्षण मंत्रालयावर हल्ला केल्याचा दावा केला. इराणची राजधानी तेरहानमध्ये देखील हल्ले केल्याचा दावा इस्त्यालनं केला आहे.

Iran Israel conflict: इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर दोन्ही देश एकमेकांवर जोरदार हल्ले चढवत आहेत . इस्रायली हल्ल्यांमध्ये प्रचंड प्रमाणात नासधूस, विध्वंस झाला असून मोठी जीवित हानी झालीय . गेल्या तीन दिवसांपासून सुरु असणाऱ्या इस्रायली हल्ल्यांमध्ये 224 लोकांचा मृत्यू 1200 हून अधिक जखमी झाल्याचं इराणच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी (14 जून ) सांगितलंय . इराणच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते हुसेन करमनपौर म्हणाले, 65 तासांच्या इस्रायली बॉम्बस्फोटानंतर एकूण 1277 लोक जखमी झाले आहेत .224 मृतांमध्ये महिला पुरुष आणि मुलांचा समावेश आहे .मृतांपैकी 90% लोक हे नागरिक असल्याचाही इराणने सांगितले आहे .
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने सांगितले,या हल्ल्यात इराणचे गुप्तचर प्रमुख मोहम्मद काझीमी आणि इतर दोन जनरल देखील मारले गेले आहेत.याशिवाय हल्ल्यात अनेक उच्चस्तरीय लष्करी अधिकारी आणि अनुशास्त्रज्ञांनी आपले प्राण गमावलेत .
इस्रायलचं म्हणणं काय ?
दुसरीकडे शुक्रवार (12 जून )पासून सुरू असणाऱ्या हल्ल्यांमध्ये 14 लोकांचा मृत्यू आणि 390 जण जखमी झाल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे . एएफपीच्या वृत्तानुसार, एका वरिष्ठ इराणी लष्करी अधिकाऱ्याने रविवारी इस्रायलच्या हल्ल्यांचा बदला घेतला जाईल असा इशारा दिला होता .कर्नल रेझा सय्यद म्हणाले की इराणच्या शूर सैनिकांचा बदला संपूर्ण इस्रायल व्यापून टाकेल . "इस्रायलने व्यापलेले क्षेत्र सोडा, कारण आता इस्रायल भविष्यात राहण्याजोगेही राहणार नाही . आश्रयस्थानंही तुमचं संरक्षण करू शकणार नाहीत . "
इराणविरुद्ध लष्करी कारवाई सुरूच राहील :नेतान्याहू
इस्रायल विरार विरुद्ध लष्करी कारवाई सुरूच ठेवेल असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले .इराणची अणूस्थळे, इस्रायल आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांसाठी धोकादायक असल्याने त्यांना नष्ट करणे आवश्यक आहे . 'आमची दोन प्रमुख उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आम्ही जे आवश्यक आहे ते करू .पहिलं म्हणजे अणूशस्त्रांचा धोका आणि दुसरं क्षेपणास्त्र हल्ल्यांचा धोका "असे नेतान्याहू म्हणाले .आम्ही हे पाऊल स्वतःच्या सुरक्षेसाठी उचलले आहे,परंतु आमचे उद्दिष्ट केवळ स्वतःला वाचवणे नाही तर जगाला या धोकादायक सरकार पासून वाचवणे आहे.जगातील सर्वात धोकादायक सरकारकडे ही शस्त्रे नसावीत .असेही ते म्हणाले .
इस्त्रायल-इराणचे हल्ले प्रतिहल्ले
इस्त्रायलनं इराणवर तिसऱ्या दिवशी हल्ले सुरु ठेवले आहेत. इस्त्रायलनं इराणच्या संरक्षण मंत्रालयावर हल्ला केल्याचा दावा केला. इराणची राजधानी तेरहानमध्ये देखील हल्ले केल्याचा दावा इस्त्यालनं केला आहे. इराणमध्ये एका रहिवासी हल्ले झाले आहेत. त्यामध्ये 29 मुलांसह 60 जणांचा मृत्यू झाला.























