US-Iran War Ceasefire: अमेरिका-इराण युद्धविराम, शहबाज शरीफांचा आनंद गगनात मावेना, म्हणाले, 'असीम मुनीर आमचे हिरो, अल्लाहने पाकिस्तानला...'
US-Iran War Ceasefire: अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या 14 दिवसांच्या युद्धविरामाचे श्रेय घेण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आपली पाठ थोपटून घेण्यास सुरुवात केली आहे.

US-Iran War Ceasefire: अमेरिका आणि इराण यांच्यातील 14 दिवसांच्या युद्धविरामाच्या (US-Iran War Ceasefire:) घोषणेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांनी या घटनेला पाकिस्तानच्या (Pakistana) इतिहासातील सर्वात 'गौरवशाली क्षण' असल्याचे म्हटले आहे. या युद्धविरामात पाकिस्तानने बजावलेली भूमिका ऐतिहासिक असून आता जग पाकिस्तानकडे आदराने पाहत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
Shahbaz Sharif: काय म्हणाले शहबाज शरीफ?
मंत्रिमंडळाच्या बैठकीला संबोधित करताना शहबाज शरीफ म्हणाले, "अल्लाहने आज पाकिस्तानला दिलेला हा सन्मान अभूतपूर्व आहे. टोक्योपासून लंडनपर्यंत आणि क्वालालंपूरपर्यंत सर्व जागतिक प्रसारमाध्यमांमध्ये पाकिस्तानची चर्चा होत आहे. असा नजराणा यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. पाकिस्तान आता कायमचा बदलला असून जगाच्या नकाशावर आमचा दर्जा वाढला आहे."
Shahbaz Sharif: असीम मुनीर 'द रिअल हिरो'
शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. शरीफ म्हणाले, "मुनीर हे केवळ युद्धाचे हिरो नाहीत, तर त्यांनी हे सिद्ध केले आहे की देशाच्या सर्वोच्च ध्येयासाठी ते राजकीय नेतृत्वाच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच आज पाकिस्तानला हे यश मिळाले आहे."
Donald Trump: ट्रम्प यांची अट आणि पाकिस्तानचे निमंत्रण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुजची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पुन्हा उघडण्याच्या अटीवर दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केली होती. या प्रक्रियेत ट्रम्प यांनी शहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांचा उल्लेख केला होता. या पार्श्वभूमीवर, शरीफ यांनी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींना 10 एप्रिल रोजी इस्लामाबाद येथे अंतिम करारासाठी आमंत्रित केले आहे.
Shahbaz Sharif: 24 कोटी जनतेचा सन्मान
पाकिस्तानच्या 24 कोटी जनतेला या गौरवाचा अधिकार असल्याचे सांगत शरीफ यांनी विश्वास व्यक्त केला की, शुक्रवारी (10 एप्रिल) होणारी चर्चेची पुढील फेरी यशस्वी होईल. जागतिक स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा उंचावली असल्याचा दावा त्यांनी यावेळी पुन्हा एकदा अधोरेखित केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या




















