एक्स्प्लोर
ऑस्ट्रेलियात घरात घुसलेला चोर शॅम्पेन पिऊन झोपी गेला
ऑस्ट्रेलियाच्या एका शहरात एका घरात चोर घुसला. मात्र चोरी न करता शॅम्पेन पिऊन झोपी गेला. घर मालकीण घरी येताच अनोळखी व्यक्तीला आपल्या खोलीत पाहून दचकली आणि तिनं पोलिसांना या गोष्टीची वर्दी दिली.

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाच्या एका शहरात एका घरात चोर घुसला. मात्र चोरी न करता शॅम्पेन पिऊन झोपी गेला. घर मालकीण घरी येताच अनोळखी व्यक्तीला आपल्या खोलीत पाहून दचकली आणि तिनं पोलिसांना या गोष्टीची वर्दी दिली. पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या अस्पेरन्स शहरात 36 वर्षीय चोर एका घरात शिरला. मात्र काही चोरी करण्यापूर्वीच त्याची नजर महागड्या शॅम्पेनच्या बाटलीवर पडली. त्यानं बाटली खोलून सर्व शॅम्पेन संपवून टाकली. मात्र एवढी शॅम्पेन प्याल्यामुळे त्याला झोप लागली. मालकिणीनं पोलिसांना माहिती दिल्यावर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान संपूर्ण बाटली शॅम्पेन प्याल्यानं चोराला प्रचंड नशा चढली होती, त्यामुळे त्याला पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
पुणे
निवडणूक























