(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Live In Relationship New Law: लग्नापूर्वी शारीरिक संबंधांवर 'या' देशात बंदी, लिव्ह इन रिलेशनशिप ठरणार गुन्हा
Indonesia New Law : इंडोनेशियातील LGBTQ समुदायावर या निर्णयाचा मोठा परिणाम होऊ शकतो, जेथे समलैंगिक विवाहाला परवानगी नाही.
Indonesia New Law : जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश इंडोनेशियात (Indonesia) नवा कायदा मंजूर केला आहे. याअंतर्गत लग्नापूर्वी शारीरिक संबंध आणि लग्नाशिवाय लिव्ह-इन रिलेशनमध्ये (love-In-Relationship) राहण्यास आता बंदी घालण्यात आली आहे. मंगळवारी, इंडोनेशियन संसदेने विवाहपूर्व लैंगिक संबंध आणि लिव्ह-इन संबंधांना गुन्हेगार ठरवणारा नवीन कायदा मंजूर केला. तसेच विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना एका वर्षाची शिक्षा होणार आहे.
देशाच्या स्वातंत्र्याला मोठा धक्का?
इंडोनेशिया सरकारचे हे पाऊल देशाच्या स्वातंत्र्याला मोठा धक्का मानला आहे. यापूर्वी, अनेकांनी या कायद्यातील सुधारणांना विरोध केला, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला मुस्लिम-बहुसंख्य राष्ट्र कट्टरतावादाकडे वळल्याबाबत निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
'हा' आहे नियम
इंडोनेशियाच्या या नवीन विधेयकाच्या कलम 413 (1) नुसार, जर एखादी व्यक्ती अशा व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवते. जे एकमेकांचे पती किंवा पत्नी नसतील. तर त्याला या व्याभिचारासाठी 1 वर्ष सश्रम कारावास किंवा श्रेणी II अंतर्गत मोठ्या दंडाची शिक्षा दिली जाणार आहे.
संपूर्ण पुराव्यानिशी तक्रार हवी
मीडिया रिपोर्ट्सनुसार हा कायदा मंजूर झाल्यानंतर, हा निर्णय इंडोनेशियातील नागरिक आणि परदेशी यांना लागू होईल. या प्रकरणात शिक्षा तेव्हाच होईल जेव्हा अधिकाऱ्यांकडे संपूर्ण पुराव्यानिशी तक्रार केली जाईल आणि गुन्हा सिद्ध होईल.
पाकिस्तानातही बंदी
विशेष म्हणजे इंडोनेशिया हा असा पहिला देश नाही. जिथे लग्नापूर्वी शारीरिक संबंधावर बंदी आहे. तर, भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये एका अध्यादेशानुसार, लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवल्यास पाच वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
लिव्ह-इनमध्ये राहणे ही दोन व्यक्तींची वैयक्तिक बाब
लिव्ह इन रिलेशनशिपची म्हणजे लग्नाशिवाय एकत्र राहणाऱ्या दोन व्यक्ती ही संकल्पना पाश्चात्य देशांतून भारतात आली आहे. पूर्वीच्या भारतीय संस्कृतीत स्त्री-पुरुषाने लग्नाशिवाय एकत्र राहणे योग्य मानले जात नव्हते, परंतु बदलत्या काळात ही संकल्पना भारतातही स्वीकारली जाऊ लागली आहे आणि आता मोठ्या प्रमाणात ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. भारतातील सर्वोच्च न्यायालयाने देखील लिव्ह-इन कायदेशीरही घोषित केले आहे. लिव्ह-इनमध्ये राहणे ही दोन व्यक्तींची वैयक्तिक बाब आहे आणि यासंदर्भात भारतीय सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी काही नियमही ठरवले आहेत, प्रत्येक जोडप्याने या नियमांची जाणीव ठेवली पाहिजे आणि त्याचे पालनही केले पाहिजे. दोन प्रौढ व्यक्ती परस्पर संमतीने एकमेकांसोबत राहू शकतात आणि कायद्याच्या दृष्टीने ते बेकायदेशीर नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. कोर्ट अशा जोडप्याला पारंपारिक विवाहात राहणारे जोडपे मानते,