एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्टॅण्ड अप कॉमेडियनचा स्टेजवरच मृत्यू, परफॉर्मन्स समजून प्रेक्षक हसत राहिले
स्टॅण्ड अप कॉमेडियन मंजुनाथ नायडू दुबईत परफॉर्म करत असताना एका बेंचवर बसला आणि जमिनीवर कोसळला. मात्र हा मंजुनाथच्या परफॉर्मन्सचाच एक भाग आहे, असं समजून प्रेक्षक खदाखदा हसत राहिले.
दुबई : भारतीय स्टॅण्ड अप कॉमेडियन मंजुनाथ नायडू याला दुबईमध्ये परफॉर्मन्स सुरु असतानाच मृत्यूने गाठलं. सिग्नेचर हॉटेलमध्ये प्रेक्षकांनी भरलेल्या सभागृहात सादरीकरण करतानाच 36 वर्षीय मंजुनाथचा कार्डिअॅक अरेस्टने मृत्यू झाला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मंजुनाथ जागेवर कोसळल्यानंतरही प्रेक्षकांना हा त्याच्या परफॉर्मन्सचाच एक भाग वाटत होता.
मंजुनाथ आपलं सादरीकरण करत असताना एका बेंचवर बसला. अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार करत तो जमिनीवर कोसळला. मात्र हा मंजुनाथच्या परफॉर्मन्सचाच एक भाग आहे, असं समजून प्रेक्षक खदाखदा हसत राहिले.
'कार्यक्रमात मंजुनाथ शेवटच्या क्रमांकावर होता. स्टेजवरुन गोष्टी सांगत त्याने प्रेक्षकांना हसवायला सुरुवात केली. तो आपले वडील आणि कुटुंबाचे किस्से सांगत होता. सगळ्यांना खूपच मजा येत होती. त्यानंतर आपल्याला कसा अस्वस्थतेचा म्हणजेच अँक्झायटीचा त्रास होतो, हे तो सांगू लागला. मिनिटभरातच तो कोसळला. प्रेक्षकांना हा त्याच्या सादरीकरणाचाच एक भाग वाटला. त्यामुळे सगळे जण हसत राहिले. मात्र घडलेल्या प्रकाराची जाणीव होताच सगळ्यांनी स्टेजकडे धाव घेतली' असं मंजुनाथचा मित्र मिकदाद दोहाडवालाने सांगितलं.
अवघ्या वीस मिनिटांत मंजुनाथपर्यंत वैद्यकीय मदत पोहचली. मात्र तोपर्यंत त्याने अखेरचा श्वास घेतला होता. मंजुनाथच्या पश्चात त्याचा भाऊ आहे. त्याच्या तारुण्यातच आई-वडिलांचं निधन झालं होतं.
'मंजुनाथ नेहमीच आनंदी असायचा. त्याची स्वप्न मोठी होती. तुम्हाला जे मिळालं आहे, त्याबद्दल कृतज्ञता बाळगा, असं तो आम्हाला नेहमी सांगायचा. विशेषतः तरुण वयात पालकांना गमावल्यानंतर त्याचे हे विचार होते' अशा आठवणी विनोदवीर सलमान कुरेशी याने जागवल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement