एक्स्प्लोर
जगातील सर्वात शक्तीशाली पासपोर्टच्या यादीत कोण कितव्या स्थानी?

नवी दिल्ली: संपूर्ण जगात सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने प्रगती करते आहे. त्यातच भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीमुळे देशाची वेगळी ओळख आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आहे. पण जागतिक पटलावर आपली स्वत:ची छाप पाडणाऱ्या भारताच्या पासपोर्टला किती महत्त्व आहे, हे जाणून तुम्हालाही आनंद होईल. ग्लोबल पासपोर्ट इंडेक्सने सन 2017 मधील जगातील सर्वात शक्तीशाली पासपोर्टची यादी नुकतीच जाहीर केली असून, यात भारताचा क्रमांक 78 वा आहे. या यादीत युरोपियन देशातील जर्मनीने अव्वल स्थानी पटकावले असून, या देशाचा व्हिसा फ्री स्कोर 157 आहे. तर भारताचा व्हिसाचा फ्री स्कोर 46 असल्याने देशाला 78 व्या स्थान लाभले आहे. विशेष म्हणजे, आशियाई देशांमधील सिंगापूरने दक्षिण कोरियाला मागे टाकून आपला व्हिसा फ्री स्कोर 156 बनवला आहे. सिंगापूरने या यादीत स्वीडनच्या बरोबरीने दुसऱ्या स्थानी मजल मारली आहे. याशिवाय आशियाई देशांमधील चीनने या रॅकिंगमध्ये भारतापेक्षा जास्त 58 व्हिसा फ्री स्कोर मिळवून 66 स्थान गाठले आहे. तर दुसरीकडे भारताचा आणखी एक शेजारी पाकिस्तानने या यादीत शेवटून दुसरा 94 वा स्थान मिळवला आहे. या यादीनुसार पाकिस्तानचा व्हिसा स्कोर फक्त 26 आहे. तर अफगाणिस्तानचा शेवटचा सर्वात शेवटचा आहे. अफगाणिस्तानने आपल्या 23 व्हिसा फ्री स्कोरच्या मदतीने 95 वे स्थान गाठले आहे. आर्टन कॅपिटल ऑफ ग्लोबल रॅकिंगने ही आकडेवारी जाहीर केली असून, कोणत्याही देशाच्या पासपोर्टच्या आधारे, दुसऱ्या देशात तुम्ही किती सहजपणे वावरु शकता, हे या आधारे निश्चित करण्यात आले. शिवाय या रॅकिंगच्या आधारे तुम्ही कोणत्या देशात मोफत प्रवेश मिळवू शकता. तसेच तुमच्या कागदपत्रांची तपासणी कितपत बारकाईने करण्यात आली आहे? हेही यातून स्पष्ट होते.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
महाराष्ट्र
भारत























