एक्स्प्लोर

अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची ऐतिहासिक कामगिरी; तिसऱ्यांदा घेतली 'अवकाशभरारी'

Sunita Williams: सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अवकाशात झेपावणार आहेत. त्यांच्यासाठी हे उड्डाण कारकिर्दीतील एक मैलाचा दगड ठरणार आहे.

Indian Origin Sunita Williams Created History: नवी दिल्ली : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांनी आणखी एक विक्रम आपल्या नावावर केली आहे. सुनीता विल्यम्स अंतराळातील चाचणी मोहिमेवर नवं अंतराळयान उडवणाऱ्या पहिल्या महिला अंतराळवीर ठरल्या आहे. 58 वर्षीय सुनीता विल्यम्स यांनी 5 जून रोजी फ्लोरिडा येथील केप कॅनाव्हरल येथून नासाचे अंतराळवीर बॅरी 'बुच' विल्मोर यांच्यासोबत बोइंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलमधून उड्डाण केलं.

बोईंग क्रू फ्लाईट टेस्ट (CFT) नावाचं मिशन नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्राम म्हणून सुरू करण्यात आलं आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर नियमित क्रू फ्लाईटसाठी स्टारलाइनर प्रमाणित करण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. हे मिशन यशस्वी झाल्यास, ते अंतराळवीरांना कक्षेतील प्रयोगशाळेत आणि तिथून नेण्यासाठी स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगननंतरचं स्टारलायनर हे दुसरं खाजगी अवकाशयान बनवेल.

सुनीता विल्यम्स यांच्यासाठी हे उड्डाण कारकिर्दीतील आणखी एक मैलाचा दगड आहे. याआधी, सुनीता विल्यम्स यांनी 2006-2007 आणि 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर केलेल्या मोहिमेदरम्यान एका महिलेने सर्वाधिक स्पेसवॉक (7) आणि स्पेसवॉक टाईम (50 तास, 40 मिनिटं) करण्याचा विक्रम केला होता.

स्टारलायनर कॅप्सूल लिफ्टऑफनंतर सुमारे 26 तासांनंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी डॉक करण्याचा प्रयत्न करेल, सुनीता विल्यम्स, विल्मोर आणि ऑर्बिटिंग आउटपोस्टसाठी 500 पाउंडपेक्षा जास्त कार्गो घेऊन जाईल.

दोन्ही अंतराळवीर सुमारे आठवडाभर अंतराळ स्थानकावर थांबतील. यादरम्यान तो स्पेस स्टेशनवर आवश्यक चाचण्या घेतील. सुनीता विल्यम्स आणि विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर त्यांची मोहीम सुरू ठेवतील, स्टारलायनरवर त्यांचं मिशन व्यावसायिक भागीदारीद्वारे अंतराळात मानवतेच्या प्रवेशाचा विस्तार करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

दरम्यान, 2012 मध्ये सुनीता विल्यम्स आंतरराष्ट्रीय इंटरनेशनल स्पेस स्टेशनच्या प्रवासादरम्यान अंतराळात ट्रायथलॉन पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. यादरम्यान, त्यांनी वेट लिफ्टिंग मशीन वापरून पोहण्याची नक्कल केली आणि हार्नेसला बांधलेल्या ट्रेडमिलवर धावल्या होत्या. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित

पुणे महापालिकेची मोठी कारवाई; पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त, एकाचा लिलाव होणार?

बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल

मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jayant Patil : दादांना शरण गेल्याशिवाय मंत्र्यांना  पर्याय नाही, मी जुना खेळाडू आहे ...तर कपात  होणाSunil Shinde Statement On Walmik Karad : वाल्मिक कराडचे 'कर्म'काडं उघड, अवादा कंपनीच्या सुनील शिंदेंच्या जबाबात काय?100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 11 March 2025 : 6 PMABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6 PM 11 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
पुणे महापालिकेची मोठी कारवाई; पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त, एकाचा लिलाव होणार?
पुणे महापालिकेची मोठी कारवाई; पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त, एकाचा लिलाव होणार?
बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल
बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
भाषणात बोललेलं खरं असतं का, निवडणुकीत 10 कोटी खर्चल्याच्या मुद्द्यावरुन बीडच्या आमदराचा यु-टर्न

उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? रामदास कदमांचा हल्लाबोल 

गृहनिर्माण सोसायट्यांच्या गाळ्यात दारुदुकान सुरु करण्यासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक, अजित पवारांची मोठी घोषणा

छत्रपती शिवराय, संभाजी महाराजांचा अपमान करणारा, इंद्रजित सावतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अडचणी वाढल्या; 24 तासांत कोल्हापूर पोलिसांसमोर सरेंडर होणार?

Embed widget