एक्स्प्लोर
अमेरिकेत 800 फुटांवरुन कोसळून भारतीय दाम्पत्याचा मृत्यू
विश्वनाथ-मीनाक्षी 'हॉलिडेज् अँड हॅपिलीएव्हरआफ्टर्स' हा ब्लॉग लिहित होते. जगभ्रमंती करताना आलेल्या साहसी अनुभवांचं कथन त्यांनी या ब्लॉगवर केलं होतं.
न्यूयॉर्क : कॅलिफोर्नियातील प्रसिद्ध योसेमिते राष्ट्रीय उद्यानात आठशे फूट उंचावरुन कोसळून एका दाम्पत्याला प्राण गमवावे लागले. दोघे जण अमेरिकेत स्थायिक झालेले केरळचे रहिवासी असल्याचं समोर आलं आहे.
29 वर्षीय विष्णू विश्वनाथ आणि 30 वर्षीय मीनाक्षी मूर्ती यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला. 2014 मध्ये दोघं विवाहबद्ध झाले होते. विश्वनाथ 'सिस्को' कंपनीत रुजू झाल्यामुळे दोघं नुकतेच न्यूयॉर्कहून सॅन होजेला स्थायिक झाले होते.
विश्वनाथ-मीनाक्षी 'हॉलिडेज् अँड हॅपिलीएव्हरआफ्टर्स' हा ब्लॉग लिहित होते. जगभ्रमंती करताना आलेल्या साहसी अनुभवांचं कथन त्यांनी या ब्लॉगवर केलं होतं.
योसेमिते व्हॅली, धबधबा यांचा नजारा दिसत असलेल्या टॅफ्ट पॉईंट या प्रसिद्ध पर्यटन स्थळाजवळ त्यांचे मृतदेह आढळले. दोघांचा नेमका अपघात कसा झाला, याविषयी कोणालाच माहिती नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement