अमेरिकन राजकारणात भारतीयांचं वर्चस्व, जो बायडेन यांच्या पत्नीची धोरण संचालक म्हणून माला अडीगा यांची नियुक्ती
अमेरिकेची पुढची प्रथम महिला होणाऱ्या जिलने प्रामुख्याने शिक्षणावर लक्ष केंद्रित केले आहे. म्हणूनच, शिक्षणाशी संबंधित धोरणाच्या संदर्भात, अनुभवी माला अडीगा यांची या पदासाठी निवड केली गेली आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेत नुकत्याच अध्यक्षीय निवडणुका पार पडल्या. गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेच्या राजकारणात भारतीयांचे वर्चस्व सतत वाढत आहे. आता अमेरिकेचे निवडलेले अध्यक्ष जो बायडेन यांनी भारतीय-अमेरिकन माला अडीगा यांना पत्नी जिल बायडेन यांची धोरण संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.
अमेरिकेची प्रथम महिला होणाऱ्या जिलने प्रामुख्याने शिक्षणावर लक्ष केंद्रित केले आहे. म्हणूनच, शिक्षणाशी संबंधित धोरणाच्या संदर्भात, अनुभवी माला अडीगा यांची या पदासाठी निवड केली गेली आहे. अडीगा बायडेन यांच्या 2020 च्या प्रचार मोहिमेची वरिष्ठ धोरण सल्लागार तर जिल यांचे वरिष्ठ सल्लागार होती. माला अडीगाने यापूर्वीही बायडेन फाऊंडेशनमध्ये उच्च शिक्षण व लष्करी कुटुंबांचे संचालक म्हणून काम केले आहे.
जो बायडन यांच्या नव्या टीममध्ये 20 हून अधिक भारतीय वंशाचे सदस्य
माला पूर्वी ओबामा सरकारमध्ये 'शैक्षणिक आणि सांस्कृतिक ब्यूरो'मध्ये शैक्षणिक कार्यक्रमांसाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहाय्यक सचिव होत्या. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वरिष्ठ महिला सल्लागार आणि जागतिक महिला विषयांच्या कार्यालयात विशेष दूत म्हणून काम केलं आहे.
भारतीय वंशाचे डॉ. विवेक मुर्ती जो बायडन यांच्या कोरोना व्हायरस टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष
अमेरिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीतही कमला हॅरिस यांचे वर्चस्व दिसून आले होते. कमला हॅरिस यांनी नुकतीच अमेरिकेच्या निवडणुकीत उपराष्ट्रपती पदावर विजय मिळविला आहे. अमेरिकेची नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कमला हॅरिस यासुद्धा भारतीय वंशाच्या आहेत.
लुईसा टेरेल व्हाईट हाऊसमध्ये जागा मिळणार बायडेन फाऊंडेशनची कार्यकारी संचालक लुईसा टेरेल यांना व्हाइट हाऊस ऑफ लेजिस्लेटिव्ह अफेयर्सच्या संचालकपदी नियुक्त केले जाईल. ओबामा प्रशासनात जिल बायडेन यांचे सामाजिक सचिव असलेले कार्लोस एलिजोंडो व्हाइट हाऊसचे सामाजिक सचिव असतील. अॅम्बेसेडर कॅथी रसेल यांना व्हाईट हाऊसच्या कार्यालयात अध्यक्षांचे व्यवहार संचालक केले जाईल.