काश्मीरबाबत ह्युंदाई पाकिस्तानच्या ट्विटनंतर भारताची कठोर भूमिका, दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून दिलगिरी व्यक्त
Hyundai : ऑटोमोबाईल कंपनी ह्युंदाईच्या (Hyundai) पाकिस्तानी (Hyundai Pakistan) शाखेने केलेल्या ट्विटमुळे नवा वाद सुरू झाला आहे. आता भारताने याबाबत कठोर भूमिका घेतली आहे.
Hyundai : भारत (India) आणि पाकिस्तानमधील (Pakistan) वाद नवा नाही. परंतु, एका ट्विटमुळे दोन्ही देशातील वाद पुन्हा वाढला आहे. आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल कंपनी ह्युंदाईच्या (Hyundai) पाकिस्तानी (Hyundai Pakistan) शाखेने केलेल्या ट्विटमुळे हा वाद सुरू झाला. आता भारताने याबाबत कठोर भूमिका घेतली आहे.
ह्युंदाई कंपनीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे भारताने नाराजी व्यक्त केली आहे. भारताच्या कठोर भूमिकेनंतर दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना फोन करून या सर्व घडामोडींवर दिलगिरी व्यक्त केली आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, "दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चुंग इओ-यंग यांनी आज फोन केला. यावेळी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय मुद्द्यांसह ह्युंदाई मुद्द्यावरही चर्चा झाली.
Received a call from ROK FM Chung Eui-yong today. Discussed bilateral and multilateral issues as also the Hyundai matter.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) February 8, 2022
ह्युंदाईच्या पाकिस्तानी डीलरच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केलेल्या मेसेजमध्ये 'काश्मीर एकता दिवस'चे समर्थन करण्यात आले होते. या पोस्टनंतर ट्विटरवर 'बॉयकॅट ह्युंदाई' हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आणि अनेकांनी ह्युंदाईची उत्पादने न घेण्याचे आवाहन केले. यानंतर, भारतातील ह्युंदाई मोटर्सने सोशल मीडियावर एका मेसेजद्वारे सांगितले की, आम्ही भारतीय बाजारपेठेसाठी वचनबद्ध आहे.
ह्युंदाई इंडियाने दिले स्पष्टीकरण
दरम्यान, या प्रकरणावर ह्युंदाईने स्पष्टीकरण दिले आहे. ह्युंदाई इंडियाने (Hyundai Motors India) ने सोशल मीडियावर एक संदेश पोस्ट केला आहे. ज्यात भारतीय बाजारपेठेशी असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. यामध्ये, कंपनीने म्हटले आहे की, "ह्युंदाई इंडिया 25 वर्षांहून अधिक काळ भारतीय बाजारपेठेत वचनबद्धतेसह कार्यरत आहे आणि राष्ट्रवादाचा आदर करण्याच्या आपल्या मजबूत नीतिमत्तेवर ठाम आहे." याशिवाय Hyundai ने भारताचे दुसरे घर असे वर्णन केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- KFC And Pizza Hut : पिझ्झा हट आणि केएफसीकडूनही काश्मीरबाबत ट्वीट, नेटकरी संतापले
- काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान ह्युंदाईच्या ट्वीटवरून रणकंदन, भारतीयांनी झापल्यावर ह्युंदाईचे स्पष्टीकरण
- Kashmir Tweet Controversy : KFC, Pizza Hut कडून काश्मिरबाबत वादग्रस्त ट्विट, काय आहे प्रकरण?