भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळाले पाहिजे: ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री
Britain Support India in UNSC: गेल्या अनेक वर्षांपासून भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) कायमस्वरूपी स्थान मिळाले म्हणून प्रयत्न करत आहे.
Britain Support India in UNSC: गेल्या अनेक वर्षांपासून भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) कायमस्वरूपी स्थान मिळावे म्हणून प्रयत्न करत आहे. यातच आता ब्रिटनही भारताच्या समर्थानात उतरल्याचे दिसत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) चालू वार्षिक बैठकीत ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जेम्स क्लेव्हरली म्हणाले आहेत की, जागतिक पटलावर भारताचे खूप महत्त्वाचे स्थान आहे. हे जगातील सर्व देशांना माहित असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळाले पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत. याचदरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची वार्षिक बैठक 17 ते 28 सप्टेंबर 2022 या कालावधीत होत आहे. ज्यामध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भारताचे नेतृत्व करत आहेत.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाचे समर्थन करताना जेम्स क्लेव्हरली म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांसारख्या दीर्घकाळापासून सुरु असलेल्या संस्थांनी आपले भविष्य प्रभावशाली बनवण्यासाठी स्वतःमध्ये बदल करणे आवश्यक आहे. ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारत-लंडनबद्दलही सांगितले की, लंडनला त्याचा आकार, आर्थिक प्रभाव यासह जागतिक स्तरावर सक्रिय भूमिका बजावताना पहायचे आहे. पीटीआयशी बोलताना क्लेव्हरली म्हणाले आहेत की, "दीर्घकाळ चालणाऱ्या आणि महत्त्वाच्या संस्थांप्रमाणेच संयुक्त राष्ट्रांनी देखील आपले भविष्य सुनिश्चित करण्यासाठी स्वतःमध्ये बदल करणे आवश्यक आहे. त्याचे भविष्य त्याच्या अलीकडील भूतकाळाप्रमाणेच प्रभावशाली असायला हवे. भारत हा जागतिक स्तरावर अनेक अर्थाने महत्त्वाचा देश आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कोणत्या देशांचा समावेश?
ब्रिटनसोबतच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत चीन, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका यांचा समावेश आहे. सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्यांपैकी ब्रिटन हा पहिला देश असल्याचे त्यांनी सांगितले. भारताला सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व देण्याचेही त्यांनी समर्थन केले आहे. मात्र सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी स्थान देण्यास चीनचा नेहमीच विरोध राहिला आहे. क्लेव्हरली आपल्या भाषणात असेही म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्र संघाची निर्मिती झाली तेव्हाच जग वेगळं होत आणि आताच वेगळं आहे. सुरक्षा परिषदेने आज जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे निर्णय घ्यायला हवे.
महत्त्वाच्या इतर बातम्या