WHO: भारताच्या सौम्या स्वामीनाथन यांचा जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिकपदाचा राजीनामा
Soumya Swaminathan: निवृत्तीची दोन वर्षे शिल्लक असताना सौम्या स्वामीनाथन यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिकपदाचा राजीनामा दिला आहे.
मुंबई: भारताच्या सौम्या स्वामीनाथन (Soumya Swaminathan) यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिकपदाचा (Chief Scientist of World Health Organisation) राजीनामा दिला आहे. सौम्या स्वामीनाथन यांच्या मुख्य वैज्ञानिक कार्यकालपदाची दोन वर्षे शिल्लक असताना त्यांनी हा राजीनामा दिला आहे.
इंडियन एक्सप्रेस वृत्तसमूहाने दिलेल्या एका वृत्तानुसार, जागतिक आरोग्य संघटनेतील (WHO) इतर अनेक अधिकारी लवकरच राजीनामे देतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेतील हाय प्रोफाईल अधिकाऱ्याने राजीनामा देण्याच्या मालिकेतील ही पहिली केस आहे असं या अहवालात म्हटलं आहे. जागतिक स्तरावर कोरोनासारखी परिस्थीती पुन्हा निर्माण होऊ शकते आणि तिच स्थिती लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटना वेगळं धोरण तयार करत आहे. या परिस्थीती संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञाने राजीनामा दिल्याने सर्वांना धक्का बसला आहे.
The seasons come and go - the statue of a man with river blindness & his son never fail to remind me why we are here @WHO. To find ways to make people healthier, and if necessary, to fight for their rights. I will miss the fantastic people who work here & whom I admire! @DrTedros pic.twitter.com/109Tcjaz30
— Soumya Swaminathan (@doctorsoumya) November 14, 2022
सौम्या स्वामीनाथन यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या भारतात परतण्याची आणि याच ठिकाणी पुन्हा काम करण्याची शक्यता आहे.
सौम्या स्वामीनाथन यांनी यासंबंधित एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये त्या म्हणाल्या की, "लोकांना आरोग्यदायी बनवण्याचे मार्ग शोधणे आणि आवश्यक असल्यास, त्यांच्या हक्कांसाठी लढणे. येथे काम करणाऱ्या आणि ज्यांचे मी कौतुक करते अशा विलक्षण लोकांची मला आठवण येईल."
जागतिक आरोग्य संघटनेच्या युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज आणि संसर्गजन्य, गैर-संसर्गजन्य रोग विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. रेन मिंगुई, मेडिसिन अॅक्सेस विभागाचे प्रमुख डॉ. मारिएंजेला बतिस्ता गॅल्व्हाओ सिमाओ यांच्यासह इतर काही पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
इतर महत्त्वाची बातमी :