एक्स्प्लोर

India Russia Sign Contract : भारत आणि रशियामध्ये मोठा करार, दिल्लीतील रशियाच्या दूतावासाकडून अधिकृत निवेदन

India Russia Sign Contract : रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर प्रथमच भारत आणि रशियामध्ये मोठ्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.

India Russia Sign Contract : रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) सुरू झाल्यानंतर प्रथमच भारत आणि रशियामध्ये मोठ्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. या दरम्यान, भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) आणि रशियन कंपनी यांच्यात करार करण्यात आला आहे. दिल्लीतील रशियाच्या दूतावासाने अधिकृत निवेदन जारी केले आहे. 

भारत आणि रशियामध्ये मोठा करार
एक मोठी रशियन कंपनी भारतातील विमानतळांसाठी लँडिंग सिस्टीम उपकरणे पुरवणार आहे. यासंदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) आणि रशियन कंपनी यांच्यात करार करण्यात आला आहे. दिल्लीतील रशियाच्या दूतावासाने अधिकृत निवेदन जारी करून म्हटले आहे की, रशियन कंपनी, सायंटिफिक अँड प्रोडक्शन कॉर्पोरेशन-रेडिओ टेक्निकल सिस्टम्स (NPO-RTS) ने भारतासोबत करार केला आहे. या दरम्यान, भारतातील विमानतळांसाठी ILS-734 लँडिंग सिस्टमचे 34 सेट देण्यात येणार आहे.

भारतातील विमानतळांसाठी रशियन कंपनी उपकरणे पुरवणार
हे 34 रेडिओ सेट्स भारतातील 24 विविध विमानतळांवर बसवले जातील. दूतावासाच्या म्हणण्यानुसार, भारताला या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून ही उपकरणे मिळण्यास सुरुवात होईल. या कराराच्या व्यवहारांसाठी राष्ट्रीय चलन म्हणजे रुपया आणि रुबल वापरली जातील. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने देशातील 24 विविध विमानतळांच्या आधुनिकीकरणासाठी या लँडिंग उपकरणांसाठी निविदा काढल्या होत्या. ज्यामध्ये जगभरातील रेडिओ सेट बनवणाऱ्या मोठ्या जागतिक कंपन्यांनी भाग घेतला होता. मात्र ही निविदा रशियन कंपनीला मिळाली.

रशियन राजदूत काय म्हणाले?

भारतातील रशियन राजदूत डेनिस अलीपोव्ह म्हणाले की, एनपीओ-आरटीएस आणि एएआय यांच्यातील करार भारतातील जमिनीवर आधारित रेडिओ उपकरणांच्या अत्यंत स्पर्धात्मक बाजारपेठेतील रशियन व्यवसायासाठी एक प्रगती ठरला आहे. कराराच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे भारतीय विमानतळाच्या पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी संयुक्त प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी नवीन संधी उपलब्ध होतील यात शंका नाही. 

महत्वाच्या इतर बातम्या

Devendra Fadanvis : चालली नाही पवारांची 'पॉवर',  राज्यसभेवर फक्त देवेंद्र फडणवीसांचा वावर

Rajya Sabha Election : सहाव्या जागेवर धनं'जय'..., भाजपची खेळी यशस्वी; धनंजय महाडिकांचा विजय, संजय पवार पराभूत

Rajya Sabha Election 2022 : संजय राऊत, प्रफुल्ल पटेल यांची बाजी, महाविकास आघाडी आणि भाजपचे तीन खासदार विजयी.. अटीतटीच्या लढतीत धनंजय महाडिक यांचा विजय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget