UNGA : 'शांततेच्या गोष्टी करून दहशतवाद पसरवणे हे तुमचे काम', पाकिस्तानच्या खोट्या आरोपांवर भारताने फटकारले
India Reply To Pakistan : विनिटो म्हणाले की, भारतावर खोटे रोप करण्यापूर्वी पाकिस्तानने स्वतःच्या काळ्या कर्तृत्वांबद्दल सांगावे. जम्मू-काश्मीरवर दावा करण्याऐवजी दहशतवाद थांबवावा.
India Reply To Pakistan : संयुक्त राष्ट्र महासभेत आज भारताने (India) पाकिस्तानच्या (Pakistan) खोट्या आरोपाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. संयुक्त राष्ट्रातील (UNGA) भारताच्या मिशनचे फर्स्ट सेक्रेटरी मिजितो विनिटो म्हणाले की, या बैठकीत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतावर खोटे आरोप केले हे खेदजनक आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Pakistan PM Shahbaz Sharif) यांनी आपल्या देशात सुरू असलेले गैरप्रकार लपवण्यासाठी या व्यासपीठाचा उघडपणे गैरवापर केला आहे. विनिटो म्हणाले की, जो देश आपल्याला आपल्या शेजाऱ्यांसोबत शांतता हवी आहे, असा दावा करतो, तो कधीही सीमेपलीकडील दहशतवादाला समर्थन किंवा मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांना आश्रय देणार नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या मंचावरून सांगितले होते की, मला वाटते की आता भारताने दोन्ही देश एकमेकांशी जोडलेले असल्याचा संदेश समजून घेण्याची वेळ आली आहे. युद्ध हा उपाय नाही, केवळ शांततापूर्ण संवादानेच काश्मीरचे प्रश्न सुटू शकतात जेणेकरून जग पुढील काळात अधिक शांततामय होईल.
#WATCH | "...Desire for peace, security in Indian subcontinent real, can be realized. That'll happen when cross-border terrorism ceases, govts come clean with int'l community&their people, minorities aren't persecuted", Mijito Vinito, First Secy, India Mission to UN #UNGA pic.twitter.com/NZWKjrjiwh
— ANI (@ANI) September 24, 2022
काश्मीरवर दावा करण्याऐवजी पाकिस्तानने सीमेवरील दहशतवाद थांबवावा : भारत
मिजितो विनिटो म्हणाले की, भारतावर खोटे आरोप करण्यापूर्वी पाकिस्तानने स्वतःच्या काळ्या कर्तृत्वांबद्दल सांगावे. जम्मू-काश्मीरवर दावा करण्याऐवजी इस्लामाबादने सीमेपलीकडील दहशतवाद थांबवावा.
पाकिस्तानातील अल्पसंख्याकांवरील अत्याचार कोणापासून लपलेले नाहीत : भारत
विनितो म्हणाले की, पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरूच आहेत. अल्पसंख्याक समाजातील हजारो तरुणींचे अपहरण केले जात आहे. मग या मानसिकतेबद्दल आपण काय निष्कर्ष काढू शकतो? ते म्हणाले की, पाकिस्तानमध्ये हिंदू, शीख आणि ख्रिश्चन कुटुंबातील मुलींचे बळजबरीने अपहरण केले जाते, त्यांचे लग्न केले जाते आणि नंतर धर्मांतर केले जाते. जगातील इतर देशांनी याची दखल घेतली पाहिजे. मानवी हक्कांबद्दल, अल्पसंख्याकांच्या हक्कांबद्दल ही चिंतेची बाब आहे.
सीमेपलीकडील दहशतवाद संपेल तेव्हाच शांतता शक्यः भारत
भारतीय उपखंडात शांतता, सुरक्षा आणि प्रगतीची इच्छा खरी आहे. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा सीमापार दहशतवाद संपेल. असं भारताकडून सांगण्यात आलं.
इतर महत्वाच्या बातम्या
Uttarakhand : भाजप नेत्याच्या मुलाला अटक; महिला कर्मचाऱ्याची हत्या, पोलीसांची गाडी अडवून संतप्त महिलांची आरोपींना मारहाण
Todays Headline 24th September : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या