बलोच, पश्तून, सिंध सगळ्यांचाच पाकिस्तानच्या सरकारवर रोष; पाकिस्तानी लष्करही कुचकामी ठरतंय.. पाकिस्तानचे चार तुकडे होणार?
निष्फळ इस्लामिक राष्ट्रवादामुळे तसेच पाकिस्तानमधील बिघडलेल्या सामाजिक आणि धार्मिक परिस्थितीमुळे सध्याच्या पाकिस्तानी सरकारच्या विरोधात, बलोच, पश्तुन आणि सिंध प्रांतातील नागरिकांचा प्रचंड रोष वाढलाय

India Pakistan Tensions: पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांना लक्ष्य करत होणाऱ्या हवाई हल्ल्यांमुळे आता भारत आणि पाकिस्तानाच्या सीमावर्ती भागातला तणाव प्रचंड वाढलेला आहे. जगभरातून दोन्ही देशांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला परतवून लावत भारताने आपल्या लष्करी सामर्थ्यासह संयम आणि अचूक कारवायांचे प्रदर्शन घडवले. भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची अंतर्गत परिस्थितीही दिवसेंदिवस अधिकच विस्कळीत होत असल्याचं चित्र आहे. इन्स्टिट्यूट फॉर कॉन्फ्लिक्ट रिसर्च अँड रिजॉल्यूशन (ICRR) चे संचालक विनय जोशी यांनी पाकिस्तानमधील सामाजिक, धार्मिक आणि राजकीय स्थितीवर भाष्य करत अनेक गंभीर निरीक्षणं मांडली आहेत. (Pakistan)
निष्फळ इस्लामिक राष्ट्रवादामुळे तसेच पाकिस्तानमधील बिघडलेल्या सामाजिक आणि धार्मिक परिस्थितीमुळे सध्याच्या पाकिस्तानी सरकारच्या विरोधात, बलोच, पश्तुन आणि सिंध प्रांतातील नागरिकांचा प्रचंड रोष वाढला आहे. पाकिस्तानातील जनता आता मुसलमान म्हणूनही पाकिस्तान सरकारला साथ देणार नाही असं निरिक्षण ICRR चे संचालक विनय जोशी यांनी नोंदवलंय.
पाकिस्तानची सामाजिक व धार्मिक परिस्थती
विनय जोशी म्हणतात की, खान अब्दुल गफ्फार खान यांचे पुत्र पाकिस्तानच्या संसदेत स्पष्ट म्हणाले होते.“गेल्या 25 वर्षांपासून आम्ही पाकिस्तानी आहोत, 1400 वर्षांपासून मुसलमान आणि 7000 वर्षांपासून आम्ही पश्तून आहोत. पहिल्या काही वर्षातच इस्लामिक राष्ट्रवाद निष्फळ ठरला आहे .पंजाबी पाकिस्तानात सगळं पाणी न्यायचं , पाकिस्तानी पंजाबमध्ये इंटरनेट, पंजाब प्रांतात इन्फ्रास्ट्रक्चर बाकीच्या पाकिस्तानात काहीच नाही असं चित्र आहे. त्यामुळे आता पाकिस्तानी पंजाब विरोधात राग आहे.त्यामुळे बलोच, पश्तुन आणि सिंध हे सध्याच्या सरकार विरोधात आहेत. पाकिस्तानातील जनता मुसलमान म्हणून त्यांना साथ देणार नाही. भारतातील मुसलमान पाकिस्तानच्या बाजूने उभे राहतील अशी स्थिती आता नाही. ही वेळ शाह मोदी यांनी साधली असल्याचंही संचालक विनय जोशी म्हणाले..
ऑपरेशन झर्ब ए अजब आणि रद्द उल फसाद
तालिबानविरोधात पाकिस्तान आर्मीने ऑपरेशन झर्ब ए अजब आणि रद्द उल फसाद राबवलं. मात्र, त्यात विशेषतः पश्तुनांवर अत्याचार झाले. 9/11 नंतर परवेझ मुशर्रफ यांनी अनेक पश्तून मुसलमान पकडून प्रत्येकी 10,000 डॉलर्समध्ये अमेरिकेला विकले, हे भयावह वास्तव विनय जोशी यांनी मांडलं. इस्लामिक उम्माह हा संकल्पनाही आता केवळ नावापुरती उरली आहे. सौदी आणि युएई यांच्या नेत्यांना केवळ स्वतःच्या गाद्या प्रिय आहेत. त्यासाठी इस्लामच्या पुरोगामी चळवळला ते मदत करतात. इराणच्या आश्रयाने हुथी चाचे फक्त इस्रायलच्या जहाजांवर हल्ला करत नाहीत तर सौदी च्या जहाजावर ही करतात .त्यामुळे उम्माह ही कल्पना यशस्वी होणार नाही असंंही विनय जोशी म्हणाले.
पाकिस्तानचे चार तुकडे होणार?
पाकिस्तानचे लगेचच चार तुकडे होतील, अशी शक्यता फारशी नाही. कारण बलुच आणि पश्तुन लोकसंख्या संख्यात्मकदृष्ट्या कमी आहे. परंतु, पाकिस्तानच्या एकात्मतेवर होणारे विविध दिशांनी दबाव आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात घडणारे बदल यामुळे या शक्यता पूर्णपणे फेटाळूनही लावता येत नाही.पाकिस्तानचे तात्काळ चार तुकडे होतील असं नाही, कारण बलुच व पश्तूनांची लोकसंख्या कमी आहे. मात्र, इराणच्या विरोधात एक नवा देश उभा करण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय पातळीवर तयार होत आहे. पाकिस्तान आर्मीचा उपयोग न होत असल्याने हा पर्याय पुढे येऊ शकतो. असंही मत ICRR) चे संचालक विनय जोशी यांनी व्यक्त केलं.
हेही पहा:























