एक्स्प्लोर

कुलभूषण जाधव यांच्याकडे दोन पासपोर्ट : पाकिस्तान

इस्लामाबाद/नवी दिल्ली : भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना हेरगिरी केल्याच्या आरोपावरुन फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही पाकिस्तानची आडमुठी भूमिका कायम आहे. आधी आपल्याकडे कुलभूषण जाधव यांच्याविरोधात सबळ पुरावे नसल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानने आता कोलांटऊडी घेतली आहे. कुलभूषण यांना कायद्याची पायमल्ली करुन शिक्षा सुनावल्याचा आरोप पाकिस्तानने फेटाळला. त्यांच्याकडे दोन पासपोर्ट आढळले आहेत. एक हिंदू, तर दुसरा मुस्लीम व्यक्तीच्या नावाने आहे. निर्दोष व्यक्तीला दोन पासपोर्ट कशाला लागतात, असा सवाल पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अजीज यांनी केला आहे. दुसरीकडे पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त गौतम बम्बावाले यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव तहमीन जंजुआ यांची भेट घेतली. कुलभूषण यांना सुनावलेल्या शिक्षेविरोधात भारत अपील करणार आहे. शिवाय भारताच्या उच्चायुक्तांनी कुलभूषण यांच्यावरील आरोपपत्राच्या दोन प्रती आणि पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची प्रतही मागवली आहे. बम्बावाले यांनी बैठकीत भारताला कुलभूषण यांना भेटू देण्याचा मुद्दाही उठवला. कुलभूषण यांना भेटण्यासाठी भारताने चौदाव्या वेळी पाकिस्तानकडे मागणी केली आहे. मात्र हे हेरगिरी प्रकरण असल्याने भेटू दिलं जाणार नाही, असं पाकिस्तानकडून सांगण्यात येत आहे. कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा ‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटकेत असलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कुलभूषण यांना परत आणण्यासाठी हालचाली पाकिस्तानच्या कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्याच्या जोरदार हालचाली सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढच्या आठवड्यात अमेरिकेतील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार भारतात येणार आहेत. यावेळी कुलभूषण यांच्या मुद्द्यावरुन चर्चा होण्याची शक्यता आहे. कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणणारच. भारतीय सरकार हा मुद्दा उच्च स्तरावर मांडणार. या मुद्द्याबाबत उच्च स्तरावर बातचीत होऊ शकते. पुढील आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार भारत दौऱ्यावर आहे. यावेळी एनएसए स्तरावर या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते. सरकारच्या सूत्रांच्या माहितीनुसार, “कुलभूषण जाधव यांचा मुद्दा भारत सरकार उच्च स्तरावर मांडणार आहे. कुलभूषण जाधव यांनी कधीही ‘रॉ’ किंवा कोणत्याही भारतीय गुप्तचर यंत्रणेसाठी काम केलं नाही. पाकिस्तानचे दावे आधारहीन आहेत. मीडियामधील वृत्त तथ्यहीन आहेत. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान नाही तर इराणमधून ताब्यात घेण्यात आलं. भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी पाकिस्तान खोटं बोलत आहे. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना कदाचित मारलं असावं, माजी गृहसचिव आर के सिंह यांचं हे विधान चुकीचं आहे. भारत सरकार कुलभूषण जाधव यांना परत आणणारच.” संबंधित बातम्या :

कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी जोरदार हालचाली

56 इंचाच्या छातीचं शौर्य दाखवण्याची हीच खरी वेळ : अशोक चव्हाण

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी कोर्टाकडून फाशीची शिक्षा

हेरगिरीच्या संशयावरुन माजी नौदल अधिकाऱ्याला पाकमध्ये अटक

कुलभूषण जाधव यांच्या मित्राशी बातचीत

कुलभूषण जाधवविरोधात निर्णायक पुरावे नाहीत, पाकची कबुली

कुलभूषण जाधवांच्या कथित कबुलनाम्याच्या व्हिडिओत 102 कट्स

हेरगिरी प्रकरणी अटकेतील कुलभूषण जाधवांचा कबुलीनामा ?

हेरगिरीच्या संशयावरुन माजी नौदल अधिकाऱ्याला पाकमध्ये अटक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tamhini Ghat Bus Accident : ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार, पालघरमधील धक्कादायक प्रकार
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushma Andhare on Devendra Fadnavis|फडणवीसांचं सरकार आल्यावर दलित, अल्पसंख्याकांच्या अत्याचारात वाढ?Dhananjay Munde Beed : Walmik Karad सोबत मुंडेंची जवळीक? धनंजय मुंडेंकडून भूमिका स्पष्टSudhir Mungantiwar Banner Nagpur | सर्वोत्तम कामगिरी करणारा मंत्री, नागपुरात मुनगंटीवारांचे बॅनरAkhilesh Shukla Kalyan | मराठी कुटुंबावर हात उगारण्याची हिंमत होतेच कशी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tamhini Ghat Bus Accident : ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार, पालघरमधील धक्कादायक प्रकार
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
Embed widget