एक्स्प्लोर

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान युद्ध सराव

सप्टेंबरमध्ये रशियात होणाऱ्या राष्ट्रीय युद्ध सरावात भारत आणि पाकिस्तान हे दोन प्रतिस्पर्धी देश सहभागी होणार आहेत. दहशतवादी कारवायांना चाप बसवण्यासाठी आयोजित या युद्ध सरावात चीनसह अनेक देश सहभागी होणार आहे.

नवी दिल्ली : सप्टेंबरमध्ये रशियात होणाऱ्या राष्ट्रीय युद्ध सरावात भारत आणि पाकिस्तान हे दोन प्रतिस्पर्धी देश सहभागी होणार आहेत. दहशतवादी कारवायांना चाप बसवण्यासाठी आयोजित या युद्ध सरावात चीनसह अनेक देश सहभागी होणार आहे. शांघाय सहयोग संघटना (एससीओ)कडून याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या संस्थेवर चीनचं प्रभुत्व असल्याने त्याची ‘नाटो’शी तुलना केली जात आहे. या युद्ध सरावाचे आयोजन उराल भागात होणार असून, एससीओमधील सर्व सदस्य देश यात सहभागी होतील. दहशतवादाचा सामना करण्यासाठी एससीओच्या आठ सदस्य देशांमध्ये परस्पर सहकार्य वाढवण्यावर विशेष भर असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात बीजिंगमध्ये एससीओ सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारमणदेखील उपस्थित होत्या. त्यांनीही सैन्य अभ्यासाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सीतारामण यांनी सांगितलं की, “स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानसारखे दोन प्रतिस्पर्धी देश युद्ध सरावात सहभागी होणार आहेत.” पण दुसरीकडे दोन्ही देशांनी संयुक्त राष्ट्राच्या शांती रक्षा मिशनमध्येही काम केलं आहे. रशिया, चीन किर्गिज गणराज्य, कझाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या राष्ट्रप्रमुखांनी 2001 मध्ये शांघायमध्ये आयोजित शिखर परिषदेत एससीओची स्थापना केली. 2005 मध्ये भारत आणि पाकिस्तान हे देश पर्यवेक्षक म्हणून या संघटनेत सहभागी झाले. या संघटनेत भारताने सदस्यत्व स्विकारण्यासाठी रशियाने, तर पाकिस्तानच्या सदस्यत्वासाठी चीनने पुढाकार घेतला होता.

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget