800 वर्षांपासूनच्या मृत ज्वालामुखीचा उद्रेक; 32 किलोमीटरवरुन दिसतोय धगधगता लाव्हा
आइसलँडमध्ये 800 वर्षांपूर्वीपासूनच्या मृत ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला आहे. अगदी दूरवरुनही ज्वालामुखीचा धगधगता लाव्हा अगदी स्पष्टपणे दिसत आहे.

नवी दिल्ली : आइसलँडच्या एका ज्वालामुखीत विस्फोट झाला आहे. आइसलँडची राजधानी रेक्याविकपासून जवळपास 32 किलोमीटर दूर असणाऱ्या या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं. हवामान विभागाने सांगितलं की, आइसलँडची राजधानी रेक्याविकमध्ये असलेल्या रेक्येनीस पेनिनसुलामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, फगराडल्स डोंगरावर असलेला 800 वर्षांपूर्वीपासूनचा हा ज्वालामुखी मृत होता. दरम्यान, आता या ज्वालामुखीतून लाव्हा बाहेर येत आहे. तसेच 32 किलोमीटर अंतरावरुनही हा ज्वालामुखी दिसून येत आहे. तसेच रिहायशी परिसरापासून हा ज्वालामुखी अत्यंत दूर आहे. या ज्वालामुखीजवळून जाणारा रस्ताही त्यापासून 2.5 किलोमीटर आहे. तिथूनही ज्वालामुखीचा धगधगता लाव्हा अगदी स्पष्टपणे दिसत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी हा भूकंप आला होता, त्यामुळे ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अशातच ज्वालामुखीचा उद्रेक होण्यापूर्वी सीस्मिक अॅक्टिव्हिटीही बंद झाली होती. ज्वालामुखीमुळे अद्याप आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं नाही. परंतु, लोकांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. तसेच घरांच्या खिडक्याही बंद ठेवण्यास सांगितलं आहे.
प्रशासनाच्या वतीनं स्थानिक लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान, आइसलँडमध्ये 30 हून अधिक सक्रिय आणि मृत ज्वालामुखी आहेत. सध्या सोशल मीडियावर ज्वालामुखीचे फोटो व्हायरल होत आहे. अनेक युजर्स या फोटोंवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- पेटंट उल्लंघनाच्या प्रकरणात Apple ला तब्बल 2234 कोटी रुपयांचा दंड, अमेरिकन न्यायालयाचा आदेश
- Mark Zuckerberg | अॅपलच्या iOS 14 प्रायव्हसी बदलाचा फायदा फेसबुकलाच; मार्क झुकरबर्गचा दावा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
