Citizenship : पाकिस्तानमध्ये नागरिकत्व कसं मिळते? हिंदू व्यक्ती अर्ज करू शकतो का? काश्मीरच्या लोकांना काय दर्जा?
Pakistan Hindu Citizenship Act : स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानमधून आलेल्या अनेकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं. पण पाकिस्तानमध्ये नागरिकत्वाचे वेगळे नियम आहेत.
मुंबई : नागरिकत्व मिळविण्यासाठी जगभरातील विविध देशांचे स्वतःचे असे काही नियम आहेत. अमेरिका आणि ब्रिटन सारख्या अनेक देशांमध्ये नागरिकत्व मिळवण्यासाठी अतिशय कडक नियम आहेत. भारतामध्येही तसे काही नियम बनवण्यात आले आहेत. पण भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानमध्ये कोणत्याही नागरिकाला नागरिकत्व मिळवण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत.
ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देताना देशाची फाळणी केली आणि त्यातून भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाले. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे तर पाकिस्तान हा इस्लामिक देश आहे. त्या देशात इस्लामशी संबंधित सर्व नियमावली तयार करण्यात आली आहे.
Pakistan Hindu Citizenship Act : पाकिस्तानी नागरिकत्व कसे मिळते?
- पाकिस्तानमध्ये नागरिकत्व मिळविण्यासाठी काही नियम आहेत. त्यानुसार आई-वडील किंवा आजी-आजोबा यांचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला होता आणि ते
- 14 ऑगस्ट 1947 नंतर पाकिस्तानबाहेरील कोणत्याही देशात कायमचे रहिवासी नव्हते. त्याला पाकिस्तानी नागरिकत्व मिळू शकते.
- एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी, त्या व्यक्तीचे पालक पाकिस्तानचे नागरिक होते.
- ज्यांच्या आई-वडिलांचा किंवा आजी-आजोबांचा जन्म 31 मार्च 1937 रोजी भारताचा भाग असलेल्या पाकिस्तानात झाला होता.
- पाकिस्तान नागरिकत्व कायदा, 1951 लागू झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या व्यक्तीला पाकिस्तानी नागरिकत्व मिळू शकते.
- 1 जानेवारी 1952 पूर्वी पाकिस्तानात पोहोचलेल्या सर्व लोकांना पाकिस्तानी नागरिकत्व मिळू शकते.
जम्मू-काश्मीरमधील स्थलांतरिताना नागरिकत्व मिळतं का?
ग्लोबल सिटीझनशिप ऑब्झर्व्हेटरीच्या अहवालानुसार, पाकिस्तानच्या नागरिकत्व कायद्यात जम्मू-काश्मीरमधील स्थलांतरितांबाबतही नियम आहेत. या अंतर्गत जम्मू-काश्मीरमधून पाकिस्तानात आलेल्या स्थलांतरितांना काश्मीरचे पाकिस्तानशी संबंध स्पष्ट होईपर्यंत पाकिस्तानचे नागरिक मानले जाईल.
याशिवाय, पाकिस्तान नागरिकत्व कायद्यांतर्गत जो कोणी पाकिस्तानचा नागरिक असेल त्यालाही राष्ट्रकूलच्या नागरिकाचा दर्जा मिळतो. पाकिस्तान फक्त त्यांच्या देशातील नागरिकांनाच धार्मिक स्वातंत्र्य देतो. तर भारतात हे स्वातंत्र्य परदेशी लोकांनाही दिले जाते.
पाकिस्तानी व्यक्तीला दोन देशांचे नागरिकत्व मिळू शकते का?
जर एखाद्या व्यक्तीला पाकिस्तानी नागरिकत्वासोबत इतर कोणत्याही देशाचे नागरिकत्व हवे असेल तर पाकिस्तानी नियमानुसार असे होऊ शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीला इतर कोणत्याही देशाचे नागरिकत्व घ्यायचे असेल तर त्याचे पाकिस्तानी नागरिकत्व रद्द केले जाते. याशिवाय पाकिस्तानबाहेर राहणाऱ्या व्यक्तीकडून पाकिस्तानी नागरिकत्व काढून घेतल्यास त्याच्या मुलांनाही पाकिस्तानी नागरिकत्व मिळणार नाही. असं असलं तरी त्याच्या मुलाला 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, त्याने एका वर्षाच्या आत पाकिस्तानी नागरिकत्वासाठी अर्ज केला तर त्याला नागरिकत्व दिलं जाऊ शकतं.
ही बातमी वाचा: