एक्स्प्लोर
प्रशांत महासागरात पाच महिने अडकलेल्या दोघींची थरारक कहाणी!
दक्षिणेला ताहितीकडे जाणारी बोट वादळाने चक्क 1000 किलोमीटर दूर जपानच्या दिशेने वाहू लागली. दिसेल तिकडे पाणी... बंद पडलेली बोट...
होनलुलू : अथांग प्रशांत महासागर... तब्बल 5 महिने बेपत्ता... जगण्याचा संघर्ष आणि 5 महिन्यांनंतर सुटका.. पाच महिन्यांपासून तिसऱ्या माणसाचं तोंड न पाहिलेल्या तरुणीचं बेभान होणं सहाजिक होतं...
या थरारक कथेची सुरुवात तब्बल 5 महिन्यांपूर्वी झाली.
तारीख- 23 मे 2017
स्थळ- होनलुलू हार्बर...
जेनिफर अपेल आणि ताशा फुईवा या दोघींनी सेलिंग बोट घेतली. हवाई ते तहितीपर्यंतचा प्रवास दोघींनी मिळून करण्याचं ठरवलं. हा प्रवास होता तब्बल 3 हजार 500 किलोमीटरचा.
23 तारखेला या दोघी निघाल्या... निळं भोर आकाश...अथांग प्रशांत महासागर... आणि रोमांचकारी प्रवास... सगळं काही परफेक्ट होतं... पण प्रवास सुरु होण्याच्या पहिल्याच आठवड्यात प्रशांत महासागरात वादळ उसळलं आणि हा स्वप्नवत प्रवास झाला नरकाचा.
दक्षिणेला ताहितीकडे जाणारी बोट वादळाने चक्क 1000 किलोमीटर दूर जपानच्या दिशेने वाहू लागली. दिसेल तिकडे पाणी... बंद पडलेली बोट... सोबत दोन कुत्रे... पण दिलासा इतकाच होता... की बोटीवर किमान 6 महिने पुरेल इतकं अन्न होतं.
बंद पडलेली बोट एखाद्या किनाऱ्यावर नेणं आता शक्य नव्हतं... त्यामुळे जिकडे वारा नेईल तिकडे जाणं आणि मदतीची वाट पाहाणं इतकंच हातात होतं. त्यात खारट पाणी शुद्ध करणारं प्युरिफायर बंद पडलं... पण संकट इथंच थांबलं नाही... शार्कच्या अख्ख्या कुटुंबानंच या दोघींवर हल्ला चढवला
एक तास एका दिवसासारखा... एक दिवस... एका महिन्यासारखा वाटत होता... सिग्नल यंत्रणा बंद पडली होती... त्यामुळे क्षितिजावर एखादी बोट दिसली... की फ्लेअर्स उडवायचे... आणि तरीही ती बोट पुन्हा अदृश्य व्हायची... दुसरा दिवस किंवा दुसरी रात्र पाहण्याची शाश्वती क्षणाक्षणाला कमी होत होती...
पण तब्बल 5 महिन्यांनंतर आशेचा एक किरण दिसला... या दोघींना वाचवण्यासाठी चक्क नेव्हीची एक बोट आली... आणि मृत्यूशी सुरु असलेला लढा... या दोघींनी जिंकला...
अर्थात या दोघींच्या या थरारक प्रवासात काही सवालही उपस्थित केले जात आहेत... वादळाची शक्यता होती हे माहित असताना प्रवास सुरु का केला? बोटीवरची उपकरणे पूर्णपणे खराब झाली नव्हती, मग संपर्क साधण्याचा प्रयत्न का केला नाही? काहीही असो... पण अथांग महासागरातल्या त्या 5 महिन्यांच्या प्रवासानं त्यांना आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन दिला आहे..
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement