एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
First Human Spaceflight: अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्यासह चार लोक अंतराळ सफरीवरुन सुरक्षित परतले
अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोसची कंपनी ब्लू ओरिजिनची टूरिझम रॉकेट न्यू शेपर्ड चार लोकांसह अवकाशात झेपावलं होतं. ते चौघांना घेऊन सुरक्षित परत आले आहे.
First Human Spaceflight: आज (मंगळवार 20 जुलै) अंतराळात नवीन इतिहासाची नोंद झाली आहे. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची कंपनी ब्लू ओरिजिनची टूरिझम रॉकेट न्यू शेपर्ड चार जणांसह आज सायंकाळी 6.30 वाजता अंतराळात झेपावलं होतं. ते पुन्हा सुरक्षित जमिनीवर परतले आहे.
या रॉकेटमध्ये जेफ बेझोस, त्याचा भाऊ मार्क, नेदरलँडमधील 18 वर्षीय ऑलिव्हर डॅमन, विमानचालन क्षेत्रातील वॅली फंक या 82 वर्षीय महिलेचा सहभाग आहे. नऊ दिवसांपूर्वी व्हर्जिन गॅलॅक्टिकचा रिचर्ड ब्रॅन्सन अंतराळ प्रवासानंतर परत आला आहे.
नवीन शेपर्ड रॉकेट कसे आहे?
- पाच मजली उंच न्यू शेपर्ड रॉकेटची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की ती सहा लोकांसह अवकाशात उड्डाण करू शकेल.
- हे रॉकेट प्रवाशांना सुमारे 340,000 फूट उंचीवर नेण्यास सक्षम आहे.
- ज्यांना यामध्ये प्रवास करायचा आहे, त्यांना काही मिनिटांसाठी सूक्ष्म ग्रॅव्हिटी अनुभवयला मिळणार आहे.
- यामध्ये बसलेले लोक पृथ्वीला उंचीवरून पाहू शकतील.
- न्यू शेफर्ड रॉकेट आणि कॅप्सूलचे नाव 1961 अंतराळवीर अॅलन शेफर्ड यांच्या नावावर आहे.
- अॅलन शेफर्ड अंतरापर्यंत पोहोचणारा पहिला अमेरिकन नागरिक होता. या सहा प्रवाशांना बसण्याची सोय आहे. मात्र, मंगळवारी संध्याकाळी चार प्रवासी त्यात बसणार आहेत.
- यात पायलट नाही आणि वाहन पूर्णपणे स्वयंचलित आहे. हे जमिनीवर तयार केलेल्या मास्टर कंट्रोल सेंटरवरून नियंत्रित केले जाते. प्रक्षेपणानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची आज्ञा देण्याची गरज नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement