एक्स्प्लोर
यूएस अध्यक्षपदासाठी हिलरींना उमेदवारी, पहिल्यांदाच महिला शर्यतीत
न्यूयॉर्क : अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने हिलरी क्लिंटन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या इतिहासात त्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्याच महिला उमेदवार ठरल्या आहेत.
व्हरमाँटचे सिनेटर बर्नी सँडर्स यांना मागे टाकत अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी यांनी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवली. पक्षातील एकजूट दाखवण्यासाठी सँडर्स यांनीच पक्षाध्यक्षांकडे हिलरी यांना उमेदवारी देण्यास सांगितल्याची माहिती आहे.
हिलरी यांना 2842 मतं मिळाली होती, तर सँडर्स यांच्या पारड्यात 1865 मतं पडली. मात्र आता सँडर्स समर्थकांनी हिलरींविरोधात निदर्शने सुरु केल्याची माहिती आहे.
रिपब्लिकन पक्षाने अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची यापूर्वीच घोषणा केली आहे. त्यामुळे 8 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या लढतीत आता हिलरी विरुद्ध ट्रम्प असा सामना रंगणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement