एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जहाज नव्हे, तरंगतं शहरच! महाकाय 'हार्मनी ऑफ द सीज'चा समुद्रप्रवास सुरु
पॅरिस (फ्रान्स) : ‘हार्मनी ऑफ द सीज’ या जगातील सर्वात मोठ्या जहाजाने अखेर आपला समुद्रप्रवास सुरु केला आहे. एक लाख 20 हजार टन वजनाच्या या जहाजाचा रविवारी फ्रान्सच्या साँ नजेएरहून प्रस्थान झालं.
हार्मनी ऑफ द सीजचे वैशिष्ट्य :
17 ड्रॉईंगरूम्स – या जहाजाची रुंदी 66 मीटर म्हणजे 217 फूट असून, म्हणजेच तुमच्या एक ड्रॉईंगरुमची रुंदी सरासरी 12 फूट असते. याचा अर्थ तुमचे 17 ते 18 ड्रॉईंगरुम्स मावतील एवढी रुंदी.
फुटबॉल मैदानापेक्षाही मोठं – हार्मनीची लांब 361 मीटर आहे. फुटबॉल मैदानाची लांबी 360 मीटर असते. यावरुन तुम्ही या जहाजाच्या लांबीची कल्पना करु शकता.
फोटो सौजन्य : विकिपीडिया
70 हजार लोकांच्या उपस्थिती – फ्रान्सच्या अटलांटिकच्या किनाऱ्यावर हार्मनी तयार केलं गेलं. जेव्हा ‘हार्मनी ऑफ द सीज’ फ्रान्सच्या साँ नजेएरहून रवाना झालं, तेव्हा पाहण्यासाठी तब्बल 70 हजारहून अधिक लोकांची उपस्थिती होती.
जहाज नव्हे, तरंगतं शहरच - ‘हार्मनी ऑफ द सीज’ एखाद्या तरंगत्या शहरासारखं वाटतं. सुमारे एक अब्ज डॉलर्स म्हणजेच 66 कोटी रुपये खर्च करुन हे महाकाय जहाज तयार केलं गेलंय.
16 मजली महाल – जहाजरुपी या तरंगत्या शहरात 16 मजले आहेत. यामध्ये 6 हजार 360 प्रवाशांना राहण्याची व्यवस्था असून, प्रवाशांच्या देखभालीसाठी 2 हजार 100 क्रू मेंबर्स आहेत.
शिवाय, 40 किमी प्रती तास असा या जहाजाचा वेग असून, यात 10 स्टोरी स्लाईड, ट्रिओ ऑफ वॉटर स्लाइड्स, किड्स वॉटरपार्क, सेंट्रल पार्क, बोर्डवॉक, पूल एंड स्पोर्ट्स जोन, सी स्पा एंड फिटनेस सेंटर, एंटरटेनमेंट प्लेस, यूथ जोन या सुविधाही देण्यात आल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रिकेट
शेत-शिवार
Advertisement