Italy PM : इटलीला आज मिळणार नवे पंतप्रधान, मुसोलिनी समर्थक जॉर्जिया मेलोनी पहिल्या महिला पंतप्रधान होणार?
Italy PM Election : इटलीमध्ये आज पंतप्रधानपदासाठी निवडणुका होत आहेत. जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनण्याची शक्यता आहे.
Italy Election : इटलीला (Italy) आज नवे पंतप्रधान मिळणार आहेत. इटलीमध्ये आज पंतप्रधानपदासाठी निवडणुका होत आहेत. नव्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) या आघाडीवर आहेत. त्यांचा विजय झाल्या जॉर्जिया मेलोनी यांनी इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा मान मिळू शकतो. जॉर्जिया मेलोनी या इटलीचा तानाशाह मुसोलिनीच्या कट्टर समर्थक आहेत. मेलोनी 'ब्रदर्स ऑफ इटली' या पक्षाच्या नेत्या आहेत. जॉर्जिया मेलोनी यांच्या नेतृत्वाखालील उजव्या विचारसरणीच्या युतीला निवडणुकीत 60 टक्क्यांहून अधिक जागांवर विजय मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मतदानात जॉर्जिया यांच्याकडे मतदारांचा कल पाहायला मिळाला. मीडिया रिपोर्टनुसार, या निवडणुकीत जॉर्जिया मेलोनी यांचा 25 ते 46 टक्के मताधिक्याने विजय होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कोण आहेत जॉर्जिया मेलोनी?
जॉर्जिया मेलोनी यांनी 2012 साली 'ब्रदर्स ऑफ इटली' (Brothers of Italy) या पक्षाची स्थापना केली. 'ब्रदर्स ऑफ इटली' हा पक्ष उजव्या विचारसरणीचा मुख्य पक्ष आहे. मेलोनी यांच्या राष्ट्रवादी भुमिकेमुळे त्यांना फायदा झाल्याचं दिसून येत आहे. जॉर्जिया मेलोनी या निवडणुकीत विजयी झाल्यास त्या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान असतील.
कट्टर उजव्या विचारसरणीच्या नेत्या असणाऱ्या जॉर्जिया मेलोनी इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनण्याची शक्यता आहे. सोमवारी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. अलिकडच्या वर्षांत मेलोनी यांच्या पक्षाने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. 2018 मधील शेवटच्या निवडणुकीत मेलोनी च्या 'ब्रदर्स ऑफ इटली' या पक्षाला फक्त 4.5 टक्के मते मिळाली होती. पण आताच्या निवडणुकांचे कल मेलोनी यांच्या बाजूने आहेत. एक्झिट पोलमध्ये मेलोनी यांच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मेलोनी यांचा 25 टक्क्यांहून अधिक मतांनी विजय होण्याचा अंदाज आहे.
जॉर्जिया मेलोनी यांची भूमिका युरोपीय संघ विरोधी
जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या नव्या पंतप्रधान झाल्यास युरोपीय संघावर (European Union) याचा परिणाम होईल. कारण जॉर्जिया मेलोनी यांची भूमिका युरोपीय संघ (EU) विरोधी आहे. त्यामुळे मेलोनी इटलीच्या पंतप्रधान झाल्यास इटली युरोपीय संघांमधून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. युरोपीय संघ निर्वासितांच्या समस्येचं मूळ कारण असल्याचं मेलोनी यांचं मत आहे. याशिवाय मेलोनी समलैंगिकतेविरोधी आहेत. त्या याआधीही समलैंगिकते विरोधात वक्तव्य करत भूमिका घेतल्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या.
मारिओ द्राघी यांच्या राजीनाम्यानंतर सरकार कोसळलं
इटलीचे तत्कालीन पंतप्रधान मारिओ द्राघी यांच्या राजीनाम्यानंतर सरकार कोसळलं. विश्वासदर्शक ठरावावेळी द्राघी यांना मित्र पक्षांनी साथ ने देता अनुपस्थिती लावल्याने इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी (Mario Draghi) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर इटलीमध्ये निवडणूक घेण्यात येत आहेत. मारिओ द्राघी सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी सेंट्रल-राईट पार्टी असलेल्या फोर्झा इटालिया, लिग आणि फाईव्ह स्टार मुव्हमेंट या पक्षांनी मतदानावर बहिष्कार टाकला. त्यामुळेच द्राघी यांचे 17 महिन्यांचं सरकार कोसळलं.