Emmanuel Macron: मी हे कधीच विसरणार नाही, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन झाले भारताच्या चहा आणि UPI प्रणालीचे चाहते
Emmanuel Macron Praise UPI:फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह चहा पिण्याचा आनंद देखील लुटला.
मुंबई : फ्रान्सचे (France) राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) भारताच्या डिजिटल पेमेंट सिस्टम युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) ने अत्यंत प्रभावित झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी आयोजित केलेल्या अधिकृत मेजवानीच्या भाषणादरम्यान, राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी UPI प्रणालीबद्दल भाष्य केलं. पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्यासह राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी चहा देखील घेतला. त्यावेळी एका दुकानदाराला पंतप्रधान मोदी यांनी युपीआयद्वारे दुकानदाराला पैसे दिले होते.
राष्ट्रपती भवनातील भाषणात राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी चहासाठी हिंदी शब्द वापरत पंतप्रधान मोदी यांच्यासोबत घेतलेला चहा मी कधीही विसरणार नाही असं म्हटलं. पुढे त्यांनी म्हटलं की, "जयपूरमधील हवा महलजवळ आम्ही एकत्र घेतलेला चहा मी कधीही विसरणार नाही. त्या चहाचे पैसे युपीआयद्वारे करण्यात आलं. . ही मैत्री आणि असा उत्सव एक परंपरा आहे आणि हीच आम्हाला एकत्र आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
पीएम मोदींनी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना दिली यूपीआयची माहिती
पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह चहा पितानाचा व्हिडिओ शेअर केला. तसेच या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी हे UPI च्या माध्यमातून चहाचे पैसे देताना दिसले. त्यांनी फ्रॉन्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना UPI द्वारे पेमेंट करण्याची संपूर्ण प्रक्रिया दाखवली होती. पेमेंट होताच दुकानदाराला पैसे मिळाले तेव्हा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडे आश्चर्यचकित झाले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी युपीआय पेमेंटविषयी देखील माहिती दिली.
2023 मध्ये फ्रान्समध्येही UPI प्रणाली सुरू करण्याची चर्चा होती
मागील वर्षी जुलैमध्ये फ्रान्सच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, भारतीय लोक लवकरच फ्रान्समध्ये युपीआय वापरु शकतील. तसेच फ्रान्सने देखील यावर सहमती दर्शवली होती. येत्या काही दिवसांत त्याची सुरुवात आयफेल टॉवरपासून होईल, म्हणजेच भारतीय पर्यटक आता रुपयांमध्ये पैसे देऊ शकतील. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे दोन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर आले होते. तसेच यंदाच्या प्रजासत्ताक दिनासाठी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं.
ही बातमी वाचा :